कोरोना चा कहर कायम, आजचे अपडेट पाहण्यासाठी वाचा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 9, 2020

कोरोना चा कहर कायम, आजचे अपडेट पाहण्यासाठी वाचा

 जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम, आज 316 जणांना कोरोना ची बाधानगरी दवंडी

नगर ः जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये ३१६ जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले. कोरोना उपचारानंतर आज ३४५ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. कोरोना उपचारादरम्यान आज तीन रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत ९७१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या १ हजार ५५७ जणांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या लॅबनुसार ९७, खाजगी प्रयोगशाळेनुसार ११० आणि अँटीजेन चाचणीत १०९ जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले.

जिल्हा रुग्णालयानुसार अहमदनगर शहरात २४, अकोले ०२, जामखेड ०४, कोपरगाव २५,  नगर तालुका ०५, नेवासा ०६, पारनेर ०२, पाथर्डी १०,  राहुरी ०२, संगमनेर ०५, शेवगाव ०४, श्रीगोंदा ०५, भिंगार शहर ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेनुसार अहमदनगर शहरात ३९, अकोले ०२, कर्जत ०२, कोपरगाव ०२, नगर तालुका ०९, नेवासा ०४, पारनेर ०७, पाथर्डी ०२, राहाता ११,  राहुरी ०६,  संगमनेर १७,  शेवगाव ०१, श्रीगोंदा ०१ आणि श्रीरामपूर  ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत अहमदनगर शहरात १०, अकोले ०५, कर्जत ०५, कोपरगाव ०५, नगर तालुका ०६,  नेवासा ०५, पारनेर ०५, पाथर्डी १४, राहाता १२, राहुरी ०२, संगमनेर २१, शेवगाव ०९, श्रीगोंदा ०२, श्रीरामपूर ०८  अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ३४५ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. या रुग्णामध्ये अहमदनगर शहरातील ९८, अकोले १६, जामखेड ०५, कर्जत १३, कोपरगाव १४, नगर तालुका १७, नेवासा २१,  पारनेर २०, पाथर्डी १६, राहाता १७, राहुरी १३, संगमनेर ६०, शेवगाव १६, श्रीगोंदा ०९, श्रीरामपूर १० अशा रुग्णांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment