सर्व ऊस गळीत केल्याशिवाय पट्टा पडणार नाही ः जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, October 9, 2020

सर्व ऊस गळीत केल्याशिवाय पट्टा पडणार नाही ः जगताप

 सर्व ऊस गळीत केल्याशिवाय पट्टा पडणार नाही ः जगताप

कुकडी कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप कूकडी सह. कारखाना पिंपळगाव पिसा मागील वर्षा चे राहीलेले शेतकर्‍याच्या उसाचे प्रति टन 500 रुपया प्रमाणे पेमेंट येत्या 30 ऑक्टबर अखेरपर्यंत शेतकर्‍याच्या खात्यात वर्ग करून चालू गळीत हंगामातील उसाला जास्तीत जास्त बाजार भाव देण्याचा प्रयत्न करणार असे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन मा. आ. राहुल जगताप यांनी केले.
    गुरुवार दिनांक 8 रोजी कारखान्याचा 17 व्या बॉयलर अग्निप्रदीपन सोहळ्या च्या कार्यक्रम प्रसंगी मा. आ. राहुल जगताप बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मा. जिप. अध्यक्ष बाबासाहेब भोस होते यावेळी बोलताना ते म्हणाले की कारखान्याची मागील गळीत हंगामातील साखरेला उठाव नसल्याचे सुमारे 53 कोटीची साखर गोडाऊन मध्ये शिल्लक आहे. तर काही शेतकर्‍यांचे मागील गळीत हंगामाचे 500 रुपये प्रति टन प्रमाणे सुमारे साडेतीन कोटी रुपये देणे बाकी आहे तेही येत्या 30 ऑक्टंबर पर्यंत अदा केले जाईल. तालुक्यात ऊस मोठ्या प्रमाणात असल्याने शेवट पर्यंत कारखाना सुरु ठेवला जाईल.या बाबत शेतकर्‍यांनी कोणतीही काळजी करू नये. ऊस वाहतूक करणार्‍या ट्रक ट्रॅक्टर या  वाहनांना आधुनिक पद्धतीची ॠझड प्रणाली बसून वाहतूक व वजन काटा प्रणाली अद्यावत करून शेतकर्‍यां च्या उसाचे वजन व बील तत्काळ मोबाईल एप्लिकेशन्स द्वारे पाठविण्याची व्यवस्था केली आहे असे यावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन मा. आ. राहुल जगताप यांनी सांगितले.
  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा साखर संचालक घनःश्याम शेलार, माजी जि. प. अध्यक्ष बाबासाहेब भोस, कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन अनिल वीर, मा. जि. प. उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार यांचे भाषण झाले. कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिपक पाटील भोसले, पं. समिती सभापती गीतांजली पाडळे, माजी नगरपालिका अध्यक्ष गटनेते मनोहर पोटे,  सर्व संचालक, नगरसेवक, सभासद, कर्मचारी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment