श्रीगोंद्याच्या तहसीलदारपदी प्रदीप पवार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, October 2, 2020

श्रीगोंद्याच्या तहसीलदारपदी प्रदीप पवार

 श्रीगोंद्याच्या तहसीलदारपदी प्रदीप पवार


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः श्रीगोंदा तहसीलदारपदी कुणाची वर्णी लागणार याबाबतच्या मागील एक ते दीड महिन्यापासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. तत्कालीन तहसीलदार महेंद्र माळी यांची बदली होऊन जवळपास दीड महिन्याचा कालावधी उलटून गेल्यानंतर आता श्रीगोंद्याला अ.नगर येथे अन्नधान्य वितरण अधिकारी म्हणून कार्यरत असणारे प्रदीपकुमार रावसाहेब पवार यांची श्रीगोंदा तहसीलदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
तत्कालीन तहसीलदार महेंद्र माळी यांनी सर्वाना सोबत घेऊन सर्व घटकांचा मेळ घालून आपला साडेतीन वर्षाचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण केला. माळी यांनी केलेल्या कामांमुळे नवीन तहसीलदारांपुढे मोठे आव्हान असणार आहे. पवार हे मूळचे शिरूर तालुक्यातील असून श्रीगोंद्याला तरुण तहसीलदार लाभल्यामुळे सर्वांच्याच अपेक्षा उंचावल्या आहेत.
     श्रीगोंदा तालुक्यात अवैध वाळू उपसा व वाहतूक मोठ्या प्रमाणात चालू असून तहसीलदार पवार यांच्या समोर अवैध वाळू उपसा व वाहतूक थांबविण्याचे मोठे आव्हान उभे आहे.

No comments:

Post a Comment