मराठा क्रांती मोर्चाचा ‘एक मराठा लाख मराठा’ चा जयघोष... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, October 2, 2020

मराठा क्रांती मोर्चाचा ‘एक मराठा लाख मराठा’ चा जयघोष...

मराठा क्रांती मोर्चाचा ‘एक मराठा लाख मराठा’ चा जयघोष...

 ‘महसूल’ मंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन!


संगमनेर :
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर येथील निवासस्थानासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलनाला सुरूवात झाली आहे.
मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांच्या शनिवारी (26 सप्टेंबर) नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. समाजाला आरक्षण मिळावे यासाठी 2 ऑक्टोबर ला खासदार, आमदार यांच्या घरासमोर निर्देशने करण्याचा निर्णय घेण्यात आला होता महसुलमंत्री, कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या शिवाजीनगर येथील घरासमोर ठिया आंदोलन करण्यात येते आहे. या आंदोलनात महसूल मंत्री थोरात यांच्या भगिनी नगराध्यक्ष दुर्गा तांबे, त्यांचे पती आमदार डॉ. सुधीर तांबे हे देखील सहभागी झाले आहेत.
      मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे सकल मराठा समाजच्यावतीने  धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ’एक मराठा, लाख मराठा’ असा जयघोष करण्यात आला. आमदारांनी आरक्षणास पाठीबा देण्याची मागणी करण्यात आली. ईडब्ल्यूएसमध्ये आरक्षण देऊ नये, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना तत्काळ फाशी द्यावी, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती कुठेपर्यंत राज्य शासनाने कुठल्याही विभागातील नोकरभरती प्रक्रिया करू नये, मराठा क्रांती मोर्चातील समन्वयक आणि तरुणांवरील राज्यातील सर्व गुन्हे मागे घ्यावे, 2019 मध्ये एमपीएससीमध्ये निवड झालेल्या मराठा उमेदवारांची निवड संरक्षित करावी, सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा समाजासाठी 12 टक्के जागा वाढवून यासाठी आर्थिक तरतूद करावी, राज्यपालामार्फत राष्ट्रपतींकडे एसईसीबी प्रवर्ग 102 घटनादुरुस्तीनुसार नोटीफायर करण्यासाठीचा प्रस्ताव पाठवावा, ओबीसीचा कोटा वाढवून मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश कारावा, सारथीच्या संस्थेच्या अध्यक्षपदी छत्रपती संभाजी राजे यांची नियुक्ती करून 100 कोटीचा निधी द्यावा, मराठा विध्यार्थींच्या शैक्षणिक फीची जबाबदार राज्य शासनाने घ्यावी आदी मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment