बलात्कार थांबणार नसतील तर महिलांना शस्त्राची परवानगी द्या ः कोठावळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, October 7, 2020

बलात्कार थांबणार नसतील तर महिलांना शस्त्राची परवानगी द्या ः कोठावळे

 बलात्कार थांबणार नसतील तर महिलांना शस्त्राची परवानगी द्या ः कोठावळे

सुपा येथील नगर-पुणे हायवेवर रस्ता रोको आंदोलन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः उत्तर प्रदेशातील हाथरस येथील  तरुणीवर झालेल्या सामुहिक बलात्कार व हत्याप्रकरणी उत्तर प्रदेश सरकार तसेच केंद्र सरकार कोणतीही ठोस भूमिका घेत नाही झालेल्या या घटनेबाबत निषेध व्यक्त करत तसेच आरोपींना फाशीची शिक्षा द्या या मागणी साठी तालुक्यातील महिलांनी नगर पुणे महामार्ग याठिकाणी रस्ता रोको आंदोलन केले यावेळी महिलांच्या भावना तीव्र होत्या त्यामुळे पोलीस प्रशासन व महिला यांच्यामध्ये काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी महिलांचे म्हणणे जाणून घेऊन त्याबाबत पाठपुरावा करू असे आश्वासन देत आंदोलन थांबवण्याची विनंती केली व महिलांनी ती मान्य करत आंदोलन मागे घेतले.उत्तर प्रदेश मधील हाथरस येथे झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणी तेथील राज्य सरकार व केंद्र सरकार आरोपींना पाठीशी घालत आहेत असेच माध्यमांचा आवाज दाबण्याचा प्रकार तेथे होत आहे त्या दलित कुटुंबाला न्याय व निर्भया’ला न्याय मिळवून देण्यासाठी पारनेर तालुक्यातील महिलांनी सुपा येथे नगर पुणे हायवे वर रस्ता रोको आंदोलन केले यावेळी काही वेळ रास्ता रोको करण्यात आला यावेळी राजेश्वरी कोठावळे यांनी केंद्र सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला तसेच देशातील बलात्कार थांबणार नसतील तर महिलांना शस्त्र बाळगण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या विषयावर गप्प का आहेत असा सवाल यावेळी महिलांनी उपस्थित केला.

No comments:

Post a Comment