नागेश विद्यालयाकडून आरोळे हॉस्पिटलला मदत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, October 5, 2020

नागेश विद्यालयाकडून आरोळे हॉस्पिटलला मदत

 नागेश विद्यालयाकडून आरोळे हॉस्पिटलला मदत

रयत कोविड केंद्र उपयुक्त ः डॉ. आरोळे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
जामखेड ः श्री नागेश विद्यालय मध्ये रयत कोरोना माहिती व मदत केंद्राचे उद्घाटन डॉक्टर शोभाताई आरोळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी श्री नागेश विद्यालयातील शिक्षकांनी 32211रुपये मदत ग्रामीण रुग्णालय आरोळे हॉस्पिटल यास  डॉ. शोभाताई आरोळे यांच्याकडे सुपूर्त केली केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष नागेश विद्यालय स्कूल कमिटीचे  राजेंद्र कोठारी नगर परिषदेचे सि.ओ मिनीनाथ दंडवते, डॉ सुनील बोराडे, प्राचार्य हरिभाऊ ढवळे तसेच स्कूल कमिटीचे हरिभाऊ बेलेकर, विठ्ठल आण्णा राऊत ,मधुकर राळेभात, प्रकाश सदाफुले ,सुरेश भोसले, जैन कॉन्फरन्स चे संजय कोठारी, प्राचार्य सुभाष फाळके, नगरसेवक दिगंबर चव्हाण, मोहन पवार सामाजिक कार्यकर्ते मंगेश आजबे, उद्योजक रमेश आजबे डॉक्टर सागर कुंडलिकराव शिंदे डॉक्टर दरेकर ,ज्येष्ठ पत्रकार प्रकाश खंडागळे, केंद्रप्रमुख नारायण राऊत ,आदर्श शिक्षक मुकुंद सातपुते प्रा. आहेरे, कुंडल राळेभात, वैजिनाथ पोले, रयत र्लेींळव-19 समन्वयक एनसीसी ऑफिसर मयूर भोसले, रमेश बोलभट,संतोष ससाने  आदी मान्यवर उपस्थित होते.
    राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून रयत र्लेींळव-19 माहिती व मदत केंद्र चे उद्घाटन करण्यात आले व सर्व नागेश विद्यालयातील सेवकांच्या वतीने प्राचार्य हरिभाऊ ढवळे यांनी ग्रामीण रुग्णालय आरोळे हॉस्पिटल यांना  32211 रु मदत मान्यवरांनी डॉक्टर शोभाताई आरोळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. जामखेड केंद्रप्रमुख नारायण राऊत व आदर्श शिक्षक मुकुंद सातपुते यांचा कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
     मनोगतामध्ये नगरपरिषद सीओ मिनीनाथ दंडवते यांनी या उपक्रमाचे कौतुक करून  रयत सेवक व त्याचे विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे व नगरपरिषदेच्यावतीने सर्व सहकार्य होईल असे मनोगत व्यक्त केले.
मधुकर राळेभात यांनी रयत कोविड-19 मदत केंद्र हा उपक्रम चांगला आहे असे व रयत चे अध्यक्ष  खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रेरणेतून ही संकल्पना आले आहे असे सांगितले. विठ्ठल राऊत त्यांनी आरोळे कुटुंबाचे जामखेडच्या जडणघडणीत मोलाचे सहकार्य व आरोळे हॉस्पिटलसाठी मदत म्हणून 2000 वीट बांधकामासाठी देत आहे.
डॉक्टर सागर कुंडलिकराव शिंदे यांनी केंद्रास डॉक्टरांचे मार्गदर्शन करू शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी  सर्व सहकार्य करू असे सांगितले. हरिभाऊ बेलेकर यांनी सर्वांचे स्वागत करून रयत मदत केंद्रात शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र कोठारी यांनी आरोळे हॉस्पिटल व नागेश विद्यालय हे सर्वसामान्यांसाठी गोरगरीब जनतेचा विचार करणारे असल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment