बाजार समितीतील अनाधिकृत गाळे पाडा अन्यथा, या जागेवर शिवालय उभारू? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, October 9, 2020

बाजार समितीतील अनाधिकृत गाळे पाडा अन्यथा, या जागेवर शिवालय उभारू?

शिवसेना नेते व तालुका विकास आघाडी नेत्यांनी घेतली मनपा आयुक्तांची भेट

बाजार समितीतील अनाधिकृत गाळे पाडा अन्यथा, या जागेवर शिवालय उभारू?


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनाधिकृतपणे बांधण्यात आलेले गाळे आठ दिवसाच्या आत न पाडल्यास ह्या जागेत शिवालय उभारण्यात येणार असल्याचा इशारा शिवसेना नगर जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांनी आज दिला. आज शिवसेना व तालुका विकास आघाडीच्या नेत्यांनी मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. आयुक्तांनी आठ दिवसांच्या आत उचित कारवाई करण्याचे लेखी आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले.
   आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मंजूर नगर रचना अहमदनगर क्र.3 अंतिम भूखंड क्र.17,20,22,23 या एकत्रित जागेच्या मंजूर रेखाकांतील खुल्या जागेत कृषी उत्पन्न बाजार समिती,अहमदनगर यांनी विनापरवाना दुकानाचे बांधकाम केलेले आहे.तत्कालीन आयुक्त तथा जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी सदर अनधिकृत बांधकाम पाडण्याची नोटीस बजावल्यानंतर बाजार समितीने मा. राज्यमंत्री, नगर विकास, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे अपील केले होते. दि 15 जुलै 2019 रोजी मा. राज्यमंत्री, नगर विकास महोदय यांनी हे अपील फेटाळले आहे.
   तरी अद्यापपर्यंत अनधिकृत बांधकाम (गाळे) पाडण्यात आलेले नाही. यावर आठ दिवसात त्वरित कार्यवाही न झाल्यास, नगर तालुका विकास आघाडीच्यावतीने व शशिकांत गाडे सर यांच्या नेतृत्वाखाली आपल्या कार्यालयात केव्हाही पुर्वसुचना न देता आंदोलन करण्यात येईल असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर बाळासाहेब हराळ, संदेश कार्ले, केशवराव बेरड यांच्या सह्या आहेत.याप्रसंगी दिलीप सातपुते, संभाजी कदम, भगवान फुलसौंदर, अनिल शिंदे, मदन आढाव, अमोल येवले, विजू पठारे, संजय शेंडगे, दत्ता कावरे, गिरीश जाधव, बाळासाहेब बोराटे, स्मिता अष्टेकर आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment