‘शिवालय’चे कामकाज पूर्ववत सुरू राहणार ः सातपुते - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, October 7, 2020

‘शिवालय’चे कामकाज पूर्ववत सुरू राहणार ः सातपुते

 ‘शिवालय’चे कामकाज पूर्ववत सुरू राहणार ः सातपुते


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः स्व. अनिल राठोड यांनी जसी महाराष्ट्राची मातोश्री मुंबईत तसी नगरजिल्हाची मातोश्री म्हणून या शिवालयची ओळख निर्माण केली. त्यांनी नागरिकांसाठी आपले जिवन समर्पित केले. एका फोनवर नागरिकांसाठी उभा राहणारा नेता अशीहि त्यांची ओळख होती. कोणताही भेतभाव न करता अनेक सामान्य कार्यकरत्याला त्यांनी मोठे केले. कायम नागरिकांना न्याय मिळवू देण्याचे काम त्यांनी केले. तशाच प्रकारे शिवालयचे कामकाज पहिल्यासारखेच सुरु राहणार.असे प्रतिपादन शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी केले.
     जेम्स अल्हाट यांच्या वाढदिवसानिमित त्यांचा सत्कार शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर, भगवान फुलसौंदर,नगरसेवक बाळासाहेब बोराटे, अरुणा गोयल, मुन्ना भिंगारदिवे,दिपक कावले,अभिषेक भोसले,आनंद लहामगे,सुमित धेंड,मयूर मैड,अक्षय नागपुरे,प्रनिल शिंदे, अरुण झेंडे उपस्थित होते.
    याप्रसंगी अभिषेक कळमकर म्हणाले नगर शहरात अनिल राठोड यांनी कायम जनतेत राहून त्यांचे प्रश्न सोडवून शिवसेनेची एक मोठी ताकद निर्माण केले आहे. त्यामुळे कोणी घाबरायचे कारण नाही. शिवसेनेवर आणि अनिल राठोड यांच्या जनतेचे अमुल्य प्रेम आहे. हे टिकवण्यासाठी आम्ही जनतेसाठी 24 तास उपलब्ध असणार आणि त्याचे प्रश्न मार्गी लावणार. शिवसेनेची ताकद अजून वाढत आहे कालच 40 युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

No comments:

Post a Comment