सर्वसामान्यांवर अन्याय होतो तेंव्हा क्रांती घडते ः आ. जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, October 2, 2020

सर्वसामान्यांवर अन्याय होतो तेंव्हा क्रांती घडते ः आ. जगताप

 सर्वसामान्यांवर अन्याय होतो तेंव्हा क्रांती घडते ः आ. जगताप

राष्ट्रवादीच्यावतीने गांधी व शास्त्री जयंती साजरी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः महापुरुषांचे विचार व तत्वज्ञान अंगीकारल्यास जीवनाचा यशस्वी मार्ग सापडतो. महात्मा गांधींनी अहिंसेने ब्रिटिशांची जुलमी राजवट उलथून लावली. त्यांनी सत्याग्रहासारखे शस्त्र सर्वसामान्यांना दिले. जेंव्हा सर्वसामान्यांवर अन्याय होत असतो, तेंव्हा क्रांती घडत असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते गांधी व शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
      यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, नगरसेवक विपुल शेटीया, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अमित खामकर, फुले ब्रिगेडचे अध्यक्ष दिपक खेडकर, वकिल सेलचे अ‍ॅड. योगेश नेमाणे, शहर उपाध्यक्ष अमोल कांडेकर, माजी नगरसेवक किसन भिंगारदिवे, युवकचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष ढाकणे, अक्षय घोरपडे, मनिष फुलडहाळे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment