पारनेरची नगरपंचायत 17 - 0 ने जिंकणारच - आ. लंके - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, October 10, 2020

पारनेरची नगरपंचायत 17 - 0 ने जिंकणारच - आ. लंके

 पारनेरची नगरपंचायत 17 - 0 ने जिंकणारच - आ. लंके

राष्ट्रवादी काँग्रेसचा नगराध्यक्ष करणार, पारनेरचे नाव देशात करणार...

  विरोधात असूनही आपण प्रभागात विविध विकास कामे केली आहेत आता यापुढे निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग विकासाचा अनुशेष भरून काढू  - नगरसेवक नंदकुमार औटी


नगरी दवंडी/प्रतिनिधी

पारनेर ः पारनेर शहर हे मतदार संघाचे नाक असून ज्या प्रमाणात शहराला सुख सुविधा मिळाल्या पाहिजेत त्या प्रमाणात मिळत नाहीये पारनेर शहर व परिसराचा जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न आपण शंभर टक्के सोडविणार आहे पारनेर शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी विकासाची मुहूर्तमेढ शहरात रोवून सुरुवात करणार असून पारनेरची नगरपंचायत 17 - 0 ने जिंकणारच असा विश्वास निलेश लंके यांनी व्यक्त केला

पारनेर नगरपंचायतीचे नगरसेवक नंदकुमार औटी यांच्या प्रभाग क्रमांक 14 मधील सेनापती बापट तलाव ते कुरणवाडी मळा या काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्याचे लोकार्पण सोहळा सेनापती बापट तलाव जलपूजन तालुक्याची सुपुत्र जितेश सरडे यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टी’च्या माहिती तंत्रज्ञान महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी निवड त्याच प्रमाणे संतोषराव औटी यांची उपकार्याध्यक्ष, त्रिद्ल सेवा सेनादल पदी निवड झाल्याबद्दल निलेश लंके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभागातील ज्येष्ठ व्यक्ती राजेंद्र औटी हे होते.

यावेळी तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे ,मा.सभापती सुदाम पवार , विजय औटी, शहराध्यक्ष संजय मते ,नगरसेवक नंदकुमार देशमुख, बापू शिंदे, दिनेश औटी, बाळासाहेब नगरे, सोमनाथ वरखडे ,सुरेश धुरपती, साहेबराव देशमाने , उमाताई बोरुडे,मयुरी औटी ,वैजयंता मते ,सुलो चना कारले ,राहुल झावरे प्रमोद पवार ,व शहरातील प्रभागातील नागरिक उपस्थित होते.

आ.  लंके पुढे म्हणाले, कोरोणाच्या काळात जनतेला सुविधा मिळाव्यात यासाठी संपूर्ण राज्याला आदर्शवत ठरेल असे शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर टाकळी ढोकेश्वर येथे उभे केले आहे कोरोणाच्या भीतीमुळे काही प्रस्थापित घराच्या बाहेर पडले नाही अशी टीका आ.लंके यांनी मा.आ.औटी यांचे नाव न घेता केली.

चाळीस वर्ष एकाच प्रश्नावर राजकारण करणारा के के रेंज चा प्रश्न साकळाई चा प्रश्न असे अनेक प्रश्न आपण शरद पवार साहेबांच्या मदतीने सोडविले असून मतदारसंघाला उंचीवर नेण्याचे काम आपण करणार आहोत कोरोना ची परिस्थिती सुधारण्यावर विकासाचा अनुशेष आपण भरणार काढणार असून पारनेर चे नाव महाराष्ट्रात नव्हे तर देशात करू असे मतदारसंघात काम करणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला अडचणीच्या काळातही औटी बंधूंनी आपली साथ धरली व सहकार्य केले याबद्दल आमदार लंके यांनी औटी कुटुंबाचे धन्यवाद मानले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष औटी यांनी केले तर आभार विजय औटी यांनी मानले.No comments:

Post a Comment