भिंगार कॅम्प पोलीसांकडून चोरीच्या 5 दुचाकी हस्तगत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, October 6, 2020

भिंगार कॅम्प पोलीसांकडून चोरीच्या 5 दुचाकी हस्तगत

 भिंगार कॅम्प पोलीसांकडून चोरीच्या 5 दुचाकी हस्तगत

दुचाकी चोरांविरुद्ध पोलिसांची जोरदार मोहीम


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
दुचाकी चोरी करून विकणार्‍या टोळींच्या विरोधात पोलिस प्रशासनाने जोरदार मोहीम उघडली असून नुसत्याच 25 दुचाकी कोतवाली पोलिसांनी हस्तगत केल्यानंतर आणखी एक दुचाकी चोराच्या भिंगार कॅम्प पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्याच्याकडून 5 दुचाकी हस्तगत केल्या आहेत.
विविध ठिकाणांहून चोरण्यात आलेल्या दुचाकी चोरणारा आरोपी पकडण्यात आला असून त्याच्याकडून पाच दुचाकी हस्तगत केले आहेत. गणेश देविराम नल्ला (वय24, रा. फर्‍याबाद, नगर-सोलापूर रोड,अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
हिरो होंडा स्प्लेंडर (एमएच16 एस 6120), बजाज डिस्कवर (एमएच16,बीजे 7762), बजाज पल्सर (एमएच16,सीडी 7199), एचएफ डिलक्स (एमएच16, बी डब्ल्यू 6258), हिरोहोंडा पल्स या पाच दुचाकी चोरट्यांकडून हस्तगत केल्या आहेत. या हस्तगत गाड्यांपैकी कुणाच्या असल्यास त्यांनी स. फौ. आरएस.मुळे (मो.9049830004) व पोहेकॉ एस व्ही पानसे (मो. 9881904041) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याने केले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, नगर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सपोनि प्रवीण पाटील यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोसई पंकज शिंदे, सफौ आर एस मुळे, पोहेकॉ एस व्ही मुळे, बी डी आघाव, राजेंद्र सुद्रीक, पोना राहुल द्वारके, पोकॉ समीर शेख, सचिन धोंडे, रमेश दरेकर आदिंच्या पथकाने ही कारवाई केली. 


No comments:

Post a Comment