लॉकडाउन काळातही हजारेंचा ऑनलाईन संवाद! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, October 10, 2020

लॉकडाउन काळातही हजारेंचा ऑनलाईन संवाद!

 लॉकडाउन काळातही हजारेंचा ऑनलाईन संवाद!

8 महिन्यांपासून देशातील प्रवास बंद पण...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः आंदोलन म्हंटले कि डोळ्यासमोर उभे राहते ते ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे चित्र आंदोलनाच्या माध्यमातून सर्वसामन्जय जनतेसाठी लढणारे अण्णा हे आजही अनेकांचे प्रेरणास्थान आहे.नेहमीच सामाजिक कामांमध्ये अग्रेसर राहणारे आण्णा हजारे यांनी लॉकडाऊन मधेही घर बसल्या आपले सामाजिक कार्य सुरूच ठेवले होते. लॉकडाऊनच्या काळात हजारे यांनी ऑनलाईन परीसंवादाच्या माध्यामातून देशातीलच नव्हे तर थेट देशाबाहेरील जनतेबरोबर तसेच आपल्या कार्यकर्त्यांशी विविध विषयावर संवाद साधला.
हजारे यांनी लॉकडाऊनच्या काळात देशभरातील विविध राज्यात व देशाबाहेरही सुमारे 12 ठिकाणी ऑनलाईन परिसंवादात घेतले आहेत. त्यातील एक परिसंवाद ऑस्टेलियामधील विद्यापीठात झाला आहे. लॉकडाऊनच्या काळात हजारे यांनी परदेशातील ऑस्टेलिया मधील ऑस्टेलिया युनिर्व्हसिटी मधील मुलांसमावेत ग्राविकास या विषयावर सुमारे दीड तासाहून अधिक काळ संवाद साधला आहे. तसेच मुंबईच्या गुरूकुल विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी आण्णांचे जीवनकार्य व प्रेरणा या विषयावर परिसंवादात झाला. नवी दिल्लीच्या राष्ट्रीय युथ पार्लमेंट, राज्यस्थानमधील गोरखपूरच्या कार्यकर्त्यांशी, त्याच बरोबर छतपूर (मध्यप्रदेश),पुण्याच्या स्वीमी विवेकानंद केंद्र,आदर्शगाव पिंपलांत्री (राज्यस्थान), अमरावती महाविद्यालय, देशभरातील ब्रम्हकुमारी विश्वविद्यालये आदी ठिकाणी झालेल्या परीसंवादातून त्यांनी मार्गदर्शन केले आहे. महिन्याकाठी 20 हजाराहून अधिक किलोमिटरचा प्रवास करणारे हजारे यांचा प्रवास गेली आठ महिने थांबला असला व लॉकडाऊनमुळे हजारे यांचा मुक्काम राळेगणसिद्धीतच असला तरीही त्यांचे मार्गदर्शन व परीसंवाद सुरूच आहे.

No comments:

Post a Comment