आयुक्त बजेट सादर करावयास टाळाटाळ का करतात? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, October 8, 2020

आयुक्त बजेट सादर करावयास टाळाटाळ का करतात?

 आयुक्त बजेट सादर करावयास टाळाटाळ का करतात?

विरोधीपक्ष नेते संपत बारस्कर यांचा सवाल


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः अहमदनगर महानगरपालिकेच्या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक मार्च महिन्यामध्ये महासभेकडे सादर केला जातज्ञे. परंतु आपल्यावर आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे या वर्षाचे आर्थिक अंदाजपत्रक सादर केले गेले नाही. गेली 7 महिने बजेट नसल्यामुळे शहरातील विविध प्रश्न प्रलंबित पडले आहेत. कोणतश्रही विकास कामे शहरामध्ये सुरू नाहीत. प्रभागातील नागरिकांच्या रोषास नगरसेवकांना सामोरे जावे लागत आहे. आयुक्त यांना गेली दोन महिन्यापासून अनेकवेळा  स्मरणपत्रे देवूनही अंदाजपत्रकाकडे कानाडोळा केला जात आहे. कोरोना बरोबरच नागरिकांचे प्रश्न सोडविणे तितकेच महत्वाचे आहे. परंतु आयुक्त विकासकामाकडे कानाडोळा करित आहेत. कोरोनाच्या नावाखाली टाळाटाळ करतात. त्यांना कोणत्याही प्रश्नाचे गांभीर्य नसल्याचे दिसून येते. विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी आयुक्त यांना प्रश्नाचा भडीमार करीत धारेवर धरले. 

त्यानंतर आयुक्तांनी अंदाजपत्रक उद्या दुपारपर्यंत नगर सचिव कार्यालयामध्ये पाठविण्यात येईल, असे सांगितले. तसेच मा.सदस्यांसाठी विकासकामासाठी 5 लाखाचा निधी रोख स्वरूपात देण्यात येणार असल्याचे सांगितले त्यापैकी एक लाख रूपये प्रत्येक सदस्यांच्या प्रभागाकरिता इलेक्ट्रीक देखभाल दुरूस्तीसाठी देण्यात आलेले आहे. उर्वरित 4 लाखाचे विकास कामे सुचविण्याचे बैठकीत सांगितले.

आयुक्त श्रीकांत मायकलवार यांची अंदाजपत्रक सादर करणेबाबत विरोधी पक्षनेते संपत बारस्कर व नगरसेवक सागर बोरूडे सुनिल त्रिंबके, प्रकाश भागानगरे, बाळासाहेब पवार, बाळासाहेब बारस्कर, मा. श्री.शिवाजी चव्हाण, मा. श्री.संजय चोपडा, मा. श्री. अमोल गाडे यावेळी शहर अभियंता उपस्थित होते.

यावेळी नगरसेवकांनी प्रभागातील विविध समस्या मांडत असताना किरकोळ कामे सुध्दा होत नसल्यामुळे नागरिकांच्या रोषाला नगरसेवकांना सामोरे जावे लागत आहे. गेली सात महिन्यापासून नगर शहरासह कॉलनी अंतर्गत पथदिवे बंद आहेत. तसेच महामार्गावरील पथदिवे बंद असल्यामुळे संपूर्ण शहर अंधारात बुडाले आहे. पावसामुळे विविध भागात खड्डयाचे साम्राज्य झाले असून खड्डे बुजविण्यासाठी साधा मुरूम देखील मिळत नाही. ड्रेनेजचे चेंबर तुटल्यामुळे मैलामिश्रीत पाणी रस्त्यावर वाहते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

तुम्ही जर आमचे प्रश्न सोडविणार नसाल तर आम्ही नागरिकांसह मनपात येवू नागरिक तुम्हाला खुर्चीवर बसू देणार नाही यासाठी लवकरात लवकर अंदाजपत्रक सादर करून विकास कामाला गती द्यावी, असे ते म्हणाले.



No comments:

Post a Comment