शिवसैनिकांच्या संकल्पनेतून वृक्षारोपण ः मच्छिंद्र बेरड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, October 1, 2020

शिवसैनिकांच्या संकल्पनेतून वृक्षारोपण ः मच्छिंद्र बेरड

 शिवसैनिकांच्या संकल्पनेतून वृक्षारोपण ः मच्छिंद्र बेरड


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः ‘मी शिवसैनिक’ या संकल्पनेतून दरेवाडी गावामध्ये दरेवाडी गावातील कट्टर शिवसैनिक मच्छिंद्र बेरड यांच्या पुढाकाराने वृक्षारोपण करण्यात आले आहे.
बेरड यांनी दरेवाडी परिसरात 200 वृक्षांची संकल्पना केली होती. मी शिवसैनिक या नावाची संकल्पनेची सुरुवात दरेवाडी येथून सुरु करण्यात आली. निसर्गाच्या विरूद्ध कुणीही जाऊ नये. प्रत्येकाने निसर्गाचे रक्षण केले पाहिजे. फक्त झाडे लावून उपयोग नाही त्यांची काळजी घेणे, पुर्णणे संगोपन करणे, तितकेच आवश्यक आहे. झाडे आहेत म्हणून आपण आहोत याचे भान सर्वांनी ठेवले पाहिजे. आपण जर ठरविले तर भविष्यात जगाला प्राणवायू पुरवणारा देश म्हणून आपण देशाचे स्थान निर्माण करू शकतो.
यावेळेस जिल्हा परिषद सदस्य संदेशजी कार्ले, शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख आशाताई निंबाळकर, तालुका प्रमुख राजू भगत, जेष्ठ सुदाम अण्णा बेरड, हरिभाऊ बेरड, रमेश बडेकर, संजू भिंगारदिवे, मल्हारी करांडे, साईनाथ साळुंके, गोरख बेरड, सुभाष करांडे, एकनाथ ससे, बाजीराव भिंगारदिवे, योगेश बडेकर,  हरिभाऊ बेरड, कमलेश करांडे, विशाल ससे, आदिनाथ साळुंके, मुकेश भिंगारदिवे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment