पोलीस निरीक्षक संतोष गायके यांचा गौरव - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, October 6, 2020

पोलीस निरीक्षक संतोष गायके यांचा गौरव

 पोलीस निरीक्षक संतोष गायके यांचा गौरव


मुंबई :
26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर एनएसजी कमांडोच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र सरकारच्या फोर्स वन या विशेष पथकात दोन वर्ष यशस्वी आणि खडतर सेवेबद्दल फोर्स वन ट्रेनिंग सेंटरचे प्रमुखप्रशिक्षण पोलीस निरीक्षक संतोष गणपतराव गायके यांचा अप्पर पोलीस महासंचालक फोर्स वन यांच्या हस्ते विशेष सेवा पदक देऊन गौरव करण्यात आला.
अहमदनगर जिल्ह्यातील केडगावचे असणार्‍या गायके यांनी 1999 मध्ये पोलीस सेवेत दाखल झाल्यानंतर विविध कोर्स, इस्त्रायल कमांडो सारखे कोर्स तसेच विविध यशस्वीरीत्या पूर्ण करताना खेळण्यात आपले प्राविण्य दाखविले. नेमबाजी, शूटिंग स्पर्धेतही मोलाची कामगिरी करताना संघाला 9 पदके मिळवून दिली.

No comments:

Post a Comment