बसस्थानकाचा प्रश्न मार्गी न लावल्यास आंदोलन ः तनपुरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, September 26, 2020

बसस्थानकाचा प्रश्न मार्गी न लावल्यास आंदोलन ः तनपुरे

 बसस्थानकाचा प्रश्न मार्गी न लावल्यास आंदोलन ः तनपुरेनगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः
जिल्ह्यातील बहुतेक सर्वच बस स्थानकांची अद्ययावत बांधकामे झाली असून जिल्हयात फक्त राहुरी बसस्थानकाचा व डेपोचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित असून  राहुरीच्या मागून काही लहान मोठ्या बस स्थानकांची कामे होऊनसुद्धा राहुरी बस स्थानकाचे इमारतीचा प्रश्न मार्गी लागत नसल्याची खंत माजी खासदार प्रसाद तनपुरे ह्यांनी व्यक्त केली. हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी न लावल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
    बसस्थानकाच्या प्रश्नाबाबत बैठक होऊनसुद्धा एसटी खात्याने ह्याबाबत कोणतेही पाऊल उचलले नसून काही दिवसापूर्वी जिल्ह्यातील इतर दोन बस स्थानकांचे प्रश्न मार्गी लागत असल्याची चर्चा असून राहुरी बस स्थानकाचे घोडे कुठे अडले असा प्रश्न करून सदरचा प्रश्न लवकर मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात असा इशारा माजी खासदार प्रसाद तनपुरे ह्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
नगर-मनमाड राज्य मार्गावरील सर्वात जास्त उत्पन्न देणारे बस स्थानक म्हणून नगर शिर्डी नंतरचे राहुरी बस स्थानक ओळखले जाते.येथून राज्यात तसेच आंतर राज्यातील प्रवाशी वाहतूक प्रवाशी ये जा करतात.हजारो प्रवाशी लॉक डाउन पूर्वी प्रवास करीत होते.कारण राहुरी ये शिर्डी शिंगणापुर ह्या दोन आंतरराष्ट्रीय देवस्थानला जोडले जाणारे बस स्थानक म्हणून ख्याती असून लांबुन येणारे प्रवाशी ह्या बसस्थानकात येतात. पण येथे एसटी डेपो नसल्याने अनेक सोयीसुविधांपासून बसस्थानक वंचित आहे. अनेक दिवसापासून राहुरी बसस्थानकाच्या दयनीय अवस्थेबद्दल वेगवेगळ्या वृतपत्रात दररोज बातम्या येत होत्या. राज्य परिवहन मंडळाच्या अधिकार्‍यानी झोपेचे सोंग घेतले असून एस टी च्या वरिष्ठ अधिकार्‍याना ह्या प्रश्नाचे गांभीर्य नाही.पण तालुक्याचा आमदार होताच ह्याप्रश्नी लक्ष देऊन लवकरच हा प्रश्न मार्गी लावू असे सांगून त्याला 6 महीने लोटले तरीही ह्याबाबत अद्याप कुठला निर्णय नाही. ह्या बाबत लवकर निर्णय न झाल्यास  लवकरच तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा तनपुरे ह्यांनी दिला.
     60 वर्षापूर्वी बांधलेली बस स्थानकाची इमारतीची अतिशय दुरावस्था झाली असून गेल्या महिन्या पासून पड़त असलेल्या पाउसाने तर बस स्थानकात पाऊस सुरु असल्याचे दिसत होते.जे काही प्रवासी बस स्थानकात येत होते ते अक्षरशा भिजत होते.स्थानकात आज येणार्‍या प्रवश्याना साधे पिण्याचे पाणी मिलत नाही की लांबुन येणार्‍या प्रवाश्याना चहा नाश्ता मिळत नाही त्यासाठी बस स्थानका बाहेर जावे लागते.बस स्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून बस स्थानकातील रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहे.अशी विचित्र अवस्था बस स्थानकाची आहे.हे सर्व प्रश्न अद्ययावत बस स्थानक बांधून पूर्ण झाल्या  शिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत.

No comments:

Post a Comment