शेतकर्‍यांनी जनावरांचे लसीकरण करुन घ्यावे ः सभापती शेळके - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, September 3, 2020

शेतकर्‍यांनी जनावरांचे लसीकरण करुन घ्यावे ः सभापती शेळके

 शेतकर्‍यांनी जनावरांचे लसीकरण करुन घ्यावे ः सभापती शेळके


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः
पारनेर तालुक्यातील शेतकर्‍यांनी लाळखुरकत रोग नियंत्रणासाठी जनावरांना लसीकरण करून घ्याव्यात ग्रामीण भागांमध्ये शेतकर्‍यांना दुग्ध व्यवसायासाठी गाय म्हशी यांचे पालन तालुक्यात मोठ्या प्रमाणात केले जाते या जनावरांना वेळेत लसीकरण केले तर होणार्‍या आजारांना टाळता येऊ शकते तसेच जनावरांचे आरोग्य चांगले राहिले तर दूध व्यवसाय वाढण्यास मदत होते त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकर्‍यांनी पशुसंवर्धन विभाग यांच्या माध्यमातून राबविण्यात येणार्‍या लसीकरणा मध्ये आपल्या जनावरांना लसीकरण करून घ्यावे असे आवाहन सभापती गणेश शेळके यांनी केले आहे.
केंद्रपुरस्कृत राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम (छ-ऊउझ) अंतर्गत पशुधनातील संसर्गजन्य लाळखुरकुत रोगनियंत्रणासाठी पशुसंवर्धन विभाग,पारनेरच्या वतीने दि .01 रोजी तालुका लघु पशुसर्वचिकित्सालय पारनेर या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास तालुकास्तरीय संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तहसिलदार ज्योती देवरे यांच्या उपस्थितीमध्ये लसीकरण मोहिमेस सुरूवात झाली.सदर मोहिम दि. 01 सप्टेंबर ते दि .15 ऑक्टोबर या 45 दिवसांमध्ये राबविण्यात येणार आहे.
सर्व पशुधनाला कानामध्ये टॅग मारून लसीकरण करावयाचे आहे.यावेळी बोलताना पंचायत समिती सभापती गणेश शेळके यांनी मार्गदर्शन करताना जनावरांमध्ये होणा-या विषाणुजन्य आजारामुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान होते. ते टाळण्यासाठी सर्व स्तरातून शेतकरी बांधव, पशुसंवर्धन विभाग व यासाठी साहाय्य करणारे खाजगी पशुवैद्यकीय व्यावसायिक यांनी प्रामाणिकपणे काम करावे असे शेळके म्हणाले तसेच ग्रामीण भागात शेती बरोबरच पशुधन महत्त्वाचे आहे शेतकरी बंधुंनी आपल्या जनावराला बिल्ला टोचून घेवून, लसीकरण करून घ्यावे असे तहसीलदार ज्योती देवरे यांनी अहवान केले.या कार्यक्रम प्रसंगी पारनेर तालुका दुध संघाचे अध्यक्ष राहुल पाटील शिंदे, तालुका पशु सर्व चिकित्सालयाचे सहाय्यक आयुक्त डॉ. ए.आर .बोठे, डॉ. एच.ए.ठुबे, डॉ. सुभाष झावरे, डॉ. नितीन गाडीलकर, डॉ. ज्ञानेश गुंड, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. एस.एस. गवारे, डॉ.पी. एन. मापारी, डॉ. ए. व्ही. पवार व परिसरातील खाजगी पशुवैद्यक व पशुसंवर्धन विभागातील कर्मचारी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment