पारनेर पंचक्रोशीतील हंगा तलाव ओव्हरफ्लो ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, September 26, 2020

पारनेर पंचक्रोशीतील हंगा तलाव ओव्हरफ्लो !

 पारनेर पंचक्रोशीतील हंगा तलाव ओव्हरफ्लो !

आमदार निलेश लंके यांच्या हस्ते जलपूजन


नगरी दवंडी/प्रतिनिधी

पारनेर ः पारनेर,हंगा, लोणी हवेली व पंचक्रोशीतील जीवनदायिनी समजली जाणारा हंगा तलाव वरुणराजाच्या कृपेने पूर्णक्षमतेने भरला असून,त्याचे जलपूजन शनिवारी पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांत हा तलाव ठराविक वेळीच भरला गेला आहे. गेल्यावर्षी या तलावातील माती उपसा झाल्यामुळे तलावाचा पाणीसाठा विस्तृत प्रमाणात वाढला आहे.पारनेर शहराला पुरवला जाणारा पाणीपुरवठा याच तलावातून होत असतो. पूर्ण क्षमतेने भरलेल्या हंगा तलावामुळे पंचक्रोशीतील अनेक हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येत असून, यापुढील अनेक महिने शेतकर्‍यांच्या हुकमी पिकांचा पाणीप्रश्न यामुळे सुटणार आहे.तसेच पारनेर व हंगा गावालाही पिण्याच्या पाण्यासाठी पूर्ण दाबाने पाणीपुरवठा  या तलावाच्या माध्यमातून यापुढील काही महिन्यात करता येईल असे जाणकारांचे मत आहे.
76.50 चौरस किलोमीटर पाणलोट क्षेत्र असणार्‍या या हंगा नदीवरील साठवण धरणाची क्षमता 66.67 दशलक्ष घनफूट इतके असून, उपयुक्त पाणीसाठा 47.48 दशलक्ष घनफूट इतका आहे. या तलावाचा मृतसाठा 17.19 इतका असून यामध्ये बुडीत क्षेत्र 50.50 हेक्टर इतके आहे. या धरणाच्या माध्यमातून किमान 226 हेक्टर सिंचन क्षेत्र असून, धरणाची उंची 15.81 मीटर आहे तर धरणाची लांबी 390 मीटर इतकी आहे . 1972 च्या दुष्काळात सुरू झालेल्या या धरणाचे काम 1978 मध्ये पूर्णत्वाला गेले.
      या जलपूजन सोहळ्यासाठी हंग्याचे सरपंच रामदास साठे, राजेंद्र  शिंदे, अशोक घुले, चंद्रकांत मोढवे, नगरसेवक डॉ. मुदतसर सय्यद, दिनेश औटी, किसनदादा गंधाडे, साहेबराव देशमाने, नंदकुमार देशमुख,, सतीश दळवी,तुकाराम नवले, संदीप शिंदे, विजय औटी, प्रा. लाकूडझोडे, श्रीकांत चौरे, डॉ. कावरे, राजू खोसे, भाऊ रासकर,ि कशोर थोरात, सुभाष ठोंबरे, सौ. उमाताई बोरुडे, सौ. वैजंता मते, सौ.सुनिता बोरुडे, बाळासाहेब नगरे, बबन चौरे, डॉ. सादिक राजे, संतोष ढवळे, नंदू सोंडकर, सुहास नगरे, राजू दळवी, दादा दळवी, कुकडी प्रकल्पाचे उपकार्यकारी अधिकारी वाळके, भांगरे, संदीप पवार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment