कोरोनामध्ये काळजी घेणे आवश्यक. लॉकडाउन आता शक्य नाही- आ रोहित पवार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, September 17, 2020

कोरोनामध्ये काळजी घेणे आवश्यक. लॉकडाउन आता शक्य नाही- आ रोहित पवार

 ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ उपक्रमांचा शुभारंभ...

कोरोनामध्ये काळजी घेणे आवश्यक. लॉकडाउन आता शक्य नाही- आ रोहित पवार


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
कर्जत ः कोरोना कशामुळे होतो हे आपल्याला समजत नाही, त्यामुळे काळजी घेणेच आवश्यक असून आता आपल्याला लॉक डाऊन करणे शक्य नाही, आर्थिक टप्प्यावर आपल्याला थांबता येणार नाही, असे प्रतिपादन आ रोहित पवार यांनी व्यक्त केले.
माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमा अंतर्गत तालुक्याच्या नियोजनाची बैठक आ रोहित पवार यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात घेतली व या मोहिमेचा  शुभारंभ करण्यात आला.
   आ रोहित पवार पुढे म्हणाले की कर्जत जामखेड तालुक्यात साडे तीन हजार शासकीय कर्मचारी कोरोना योद्धे म्हणून काम करत आहेत, कर्जत तालुक्यात उपजिल्हा रुग्णालयात 50 बेड ऑक्सिजनच्या करत आहोत, तीन दिवसात त्या रेडी होतील, या काळात सर्वांवरच प्रेशर आहे, यातून आपण काम करत राहू तसे मात करत राहू, अडचणी आहेत  वरत्यावर मात करू, ऑक्सिजन युक्त अम्ब्युलन्स मा शरद पवार साहेबांनी फोर्स मोटर्स कडून आपल्या तालुक्याला मिळवून दिली आहे. पुढच्या सात दिवसात ती उपलब्ध होणार आहे. 100 जम्बो सिलेंडर आपण वैयक्तिक घेतले आहेत, ऑक्सिजन कमी पडणार नाही यासाठी प्रयत्न करत आहोत, 100 ऑक्सिमिटर व 100 थर्मामीटर माझ्या वतीने उपलब्ध करून देतो ते चार पाच दिवसात आपल्या पर्यत पोहचतील, ज्या ताकदीने आपण काम करत आहात त्या सर्वांबद्दल आभार मानले, माझे कुटुंब माझी जबाबदारी हा उपक्रम आपल्याला राजकारण बाजूला ठेऊन राबवायचा आहे. येणार्‍या काळात सुबत्ता येणार आहे मात्र मध्येच कोरोनाचे महासंकट आले आहे, अधिकारी पदाधिकारी नागरिक थेट सम्पर्कात असतात, सर्वाना एकत्र यावे लागेल असे आवाहन केले. यावेळी जी प समाजकल्याण विभागाचे सभापती उमेश परहर, सभापती अश्विनी कानगुडे, उपसभापती हेमंत मोरे, नगर पंचायत च्या नगराध्यक्षा सौ प्रतिभा भैलूमे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र गुंड, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब गुंड यांच्या सह पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, गट विकास अधिकारी अमोल जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदीप पुंड, मुख्याधिकारी गोविंद जाधव,नायब तहसीलदार मनोज भोसेकर,नितीन धांडे, भास्कर भैलुमे, भाऊ तोरडमल आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन निवासी नायब तहसीलदार सुरेश वाघचौरे यांनी केले. शेवटी अव्वल कारकून श्रीरंग अनारसे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment