कोरोना मृतांची खरी संख्या दोन दिवसात न दिल्यास नागरिकांसह ठिय्या आंदोलन - निखिल वारे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, September 11, 2020

कोरोना मृतांची खरी संख्या दोन दिवसात न दिल्यास नागरिकांसह ठिय्या आंदोलन - निखिल वारे

 कोरोना मृतांची खरी संख्या दोन दिवसात न दिल्यास नागरिकांसह ठिय्या आंदोलन - निखिल वारे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून, मृत्यूचे प्रमाण देखील जास्त आहे. अमरधाममध्ये होणार्या अंत्यसंस्काराची संख्या आणि मनपाने मृत झालेल्या कोरोनाग्रस्तांची संख्या पाहता खूप मोठी तफावत आढळल्याने प्रशासन खरी संख्या का लपवते? कोरोना मृतांची खरी संख्या दोन दिवसांत मनपाने न दिल्यास  नगरसेवकांसह नागरिकांचे ठिय्या आंदोलन करण्याचा  इशारा माजी नगरसेवक निखिल वारे यांनी दिला आहे.चार दिवसांपूर्वीच अमरधाममधील कोरोनाग्रस्त मृतांवर झालेल्या अंत्यसंस्काराची यादी बोरा ट्रस्टकउून घेतली, त्यामुळे 456 जणांवर अंत्यसंस्कार झाल्याची नोंद होती तर मनपाकडून 300 रुग्ण दगावल्याची माहिती दिली गेली. यामध्ये तफावत आढळल्याने प्रशासन खरी संख्या लपवते का? अशी शंका आल्याने मनपाकडे पाठपुरावा केला, आरोग्यविभागाकडे चौकशी केली. आयुक्त, आरोग्याधिकार्‍याकडून काही माहिती मिळेना. खरी माहिती  व सत्य लपवण्याचा प्रयत्न होतो हे यावरुन दिसते, असे श्री. वारे म्हणाले. जर मनपाने दोन दिवसात सत्य जाहीर केले नाही, मृतांचा खरा आकडा सांगितला नाही तर प्रभाग क्र.2 चे नगरसेवक सुनिल त्र्यंबके, विनित पाउलबुधे, बाळासाहेब पवार यांच्यासह नागरिक मनपामध्ये ठिय्या आंदोलन करणार असल्याचे निखिल वारे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment