नागरिकांच्या जीवाशी खेळू नका - अभिमन्यू जाधव - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, September 9, 2020

नागरिकांच्या जीवाशी खेळू नका - अभिमन्यू जाधव

 महापालिकेच्या ढिसाळ कारभाराबाबत गांधीगिरी करून व्यक्त केला निषेध

नागरिकांच्या जीवाशी खेळू नका - अभिमन्यू जाधव


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः नगर शहराच्या मुख्य रस्ता दिल्ली गेट या रस्त्यावर कायम मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी असते हा रस्ता नुकताच नवीन काँक्रिटचा करण्यात आला पण गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याचे उर्वरित काम रखडल्यामुळे नागरिकांना वाहन चालवताना अनेक  त्रास सहन करावा लागत आहे तसेच या या रस्त्याच्या मध्य भागी नालीचे चेंबर नसल्यामुळे त्या ठिकाणी अनेक अपघात होत आहे ही नाली मोठी असल्यामुळे यामध्ये लहान मुलांपासून 14 वर्षापर्यंत चे मुलं सहजपणे आत फसू शकतात याठिकाणी अनेक अपघात झाले आहेत याकडे कोणाचेच लक्ष नाही महापालिकेने पण दुर्लक्ष केले आहे म्हणून अभिमन्यू युवा मंचाचे अध्यक्ष अभिमन्यू जाधव यांनी या उघड्या नाली वर तसेच रस्त्याच्या मध्यभागी असणारे मातीचे मोठ-मोठे ढिगार्‍यावर पुष्पहार अर्पण करून गांधीगिरी करत महापालिकेचा निषेध व्यक्त केला यावेळी ऋतिक अडेप प्रज्वल वाकचौरे गणेश  पुट्टा उपस्थित होते.

      अभिमन्यू जाधव म्हणाले नगर शहर आणि उपनगरला जोडणारा हा दिल्लीगेट चा रस्ता मुख्य रस्ता आहे नागरिक मोठ्या प्रमाणावर या रस्त्यावरून ये-जा करतात त्यामुळे ह्या रस्त्यावर कायम वाहनांची गर्दी असते तसेच अनेक जड वाहने सुद्धा या रस्त्यावरून जातात त्यात अशा प्रकारे रस्त्याच्या मध्यभागी मोठे मातीचे ढिगारे गेल्या अनेक दिवसांपासून पडलेले आहेत रस्त्याच्या वळणावरच मध्यभागी चेंबर ला झाकण नसल्यामुळे या पावसाळ्यात पाऊस जोरात पडत असतो त्यावेळी सर्वत्र लाईट बंद झालेली असते हे रस्त्यावरही अंधार असतो त्यामुळे सायंकाळनंतर याठिकाणी मोठ्या प्रमाणावर अपघात होतात नागरिकांना त्यांच्या शारीरिक दुखापतीला सामोरे जावे लागते मनपा आणि  ठेकेदाराच्या या ढसाळ कारभारामुळे नागरिकांना त्रास सोसावा लागतो. मनपाने नागरिकांच्या जीवाशी खेळू नये हे असे आव्हानही अभिमन्यू जाधव यांनी यावेळी केले.

No comments:

Post a Comment