माळदाचे घर कोसळून एक जण जागीच ठार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, September 19, 2020

माळदाचे घर कोसळून एक जण जागीच ठार

 माळदाचे घर कोसळून एक जण जागीच ठार


नगरी दवंडी/प्रतिनिधी

शेवगाव ः भारतासह महाराष्ट्रात कोरोना ने थैमान घातलेले असताना अवकाळी पावसाने अशीच एक घटना शेवगाव तालुक्यातील डोंगर आखेगाव येथे घडली आहे आखेगाव येथील शेतकरी नानाभाऊ शंकर कोल्हे त्यांच्या राहत्या घरी सकाळी सहाच्या दरम्यान त्यांच्या  राहत्या  घरी शेळ्या बांधण्यासाठी गेले असता माळदाचे घर कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

शेवगाव तालुक्यातील डोंगर आखेगाव येथे नानाभाऊ शंकर कोल्हे वय 79 वर्ष हे त्यांच्या राहत्या घरी दिनांक 19/ 9 /2020 रोजी सकाळी सहाच्या दरम्यान शेळ्या बांधण्यासाठी गेले असतात खणाचे घर कोसळून कोल्हे मातीच्या ढिगार्‍याखाली गाडले गेल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. सदर घटना गावातील लोकांना कळतात लोकांनी मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु तो प्रयत्न सफल न झाल्यामुळे जे.सी.बी.मशीन च्या साह्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला. सदर घटना चार दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे घडली आहे. सदर घटनेचा पंचनामा का.तलाठी, पोलीस पाटील, मंडलाधिकारी  यांनी हा पंचनामा केला आहे.मयत नानाभाऊ कोल्हे यांच्या पश्चात पत्नी मुले सुना नातवंडे असा परिवार आहे.No comments:

Post a Comment