भोयरे गांगर्डात आमदार लंके याच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, September 12, 2020

भोयरे गांगर्डात आमदार लंके याच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन

 भोयरे गांगर्डात आमदार लंके याच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः पारनेर तालुक्यातील भोयरे गांगर्डा येथे आमदार निलेश लंके यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा शुक्रवार दि.11 रोजी पार पडला.
यामध्ये स्वागत कमान,आरो प्लांट, समाजमंदिर, विठ्ठलवाडी अंगणवाडी व विठ्ठलवाडी वनीकरण रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले तर 25/15 रस्ता काँक्रिटीकरण, चौदाव्या वित्त आयोगातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वॉल कंपाऊंड आदी विकास कामांचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले.यावेळी स्वागत कमान, समाजमंदिर, आरो, अंगणवाडी आदी कामे उत्तम दर्जाचे झाले असल्याने आ.लंके यांनी समाधान व्यक्त केले.तसेच या पुढे देखील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नसल्याचेही आ.लंके यांनी सांगितले.पाणी वाटप कर्मचारी बाळासाहेब करंजुले, अंगणवाडीसाठी जागा उपलब्ध करून देणारे चांगदेव नाईक व ठेकेदार यांचा आ.लंके यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी राष्ट्रवादी युवती तालुकाध्यक्ष पुनमताई मुंगसे, सरपंच भाऊसाहेब भोगाडे, उपसरपंच दौलत गांगड, सेवा सोसायटीचे अध्यक्ष अशोक पवार, उपाध्यक्ष प्रविण गायकवाड, सेवा सोसायटीचे संचालक आप्पासाहेब रसाळ, सुभाष भोगाडे, कळमकरवाडीचे मा. सरपंच अरूण कळमकर, भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सचिन पठारे, मा. सरपंच भाऊसाहेब चांगदेव भोगाडे, मा. अध्यक्ष दादासाहेब रसाळ, प्रशांत रसाळ, अर्जून डोंगरे, दादासाहेब जवक, संजय पवार,आदीनाथ गायकवाड, प्रतिक रसाळ, मोहन पवार, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र रसाळ,प्रदिप रसाळ, बापू भोगाडे, शिवाजी भोगाडे, भगवान रसाळ, संपत पाडळे, सागर सातपुते, मंदा साबळे, आशा रसाळ, उज्वला भोगाडे, सुरेखा रांजणे, सुप्रिया केकडे आदी यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment