रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलतर्फे लक्ष्मीनारायण मंडळाच्या शाळेस भरीव मदत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, September 14, 2020

रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलतर्फे लक्ष्मीनारायण मंडळाच्या शाळेस भरीव मदत

 रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलतर्फे लक्ष्मीनारायण मंडळाच्या शाळेस भरीव मदत


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर
ः स्वकुळसाळी हीत संवर्धक मंडळ अहमदनगर यांच्या श्री लक्ष्मीनारायण शिशु शिक्षक मंडळ संचलित संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशाळेला लिट्रसी मंथचे औचित्य साधुन व  शिक्षक दिन कार्यक्रम निमीत्त रोटरी मार्फत संस्थेचे पदाधिकारी व रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यप्रशाळा व कार्यक्रम संपन्न झाले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षकांचा सन्मान  रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलच्यावतीनं करण्यात आला.
रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल यांच्यातर्फे शाळेला रोख 11000/- देणगी तसेच नवीन शाळेच्या इमारतीसाठी रु 9000/- रुपये किमतीचे नळ रु 3500/- किमतीचे युरीनल तसेच ई-लर्निगचे सॉफ्टवेअर रु 65000/- अशी एकुण मदत देण्यात आली. तसेच मा. अध्यक्ष दत्ता दीक्षित यांनी वैयक्तिक मद्दतीपोटी 5000/- रु चा चेक ट्रस्टी यांचेकडे सुपुर्त केला.
यावेळी बोलताना प्रसन्न खाजगीवाले यांनी सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित राहु नये या उद्धिष्टाने शिक्षकांचे प्रयत्न व त्यांनी अवलंबलेले ऑनलाइन शिक्षण प्रणाली करीता शिक्षकांप्रती आभार व्यक्त केले.या संपुर्ण महिनाभर, शिक्षण महिना म्हणुन साजरा करण्याचा मानस व त्यातुंन शिक्षकांसाठी रोटरी क्लब ाफ अहमदनगर सेंट्रल यांनी क्लब स्तरावर आणि नंतर प्रांत स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करण्याचे नियोजन आम्ही करत आहोत व लवकरच या संदर्भातील माहिती सर्वांपर्यंत पोहचवली जाईल असे सचिव ईश्वर बोरा यांनी सांगितले.
याप्रसंगी अरुण दळवी सर ही उपस्थित होते व त्यांचा संस्थच्यावतीने सत्कार करण्यात आला तसेच रोटरी क्लब ाफ अहमदनगर सेंट्रलच अध्यक्ष प्रसन्न खाजगीवाले, सचिव ईश्वर बोरा, मा. अध्यक्ष दत्ता दीक्षित, धीरज मुनोत, विजय जुंदरे यावेळी उपस्थित होते. उपस्थितांचा सत्कार शालेय समितीचे चेअरमन  विक्रम पाठक यांनी केला. यावेळी संस्थेचे चिफ ट्रस्टी धिरडे, ट्रस्टी  संजय सागांवकर, गणेश अष्टेकर, सदस्य जितेंद्र लांडगे, शालेय समितीच्या सदस्या श्रीमती मृणालिनी कनोरे उपस्थित होत्या, शालेय समितीचे सचिव  महेश कांबळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून सर्वांचे आभार मानले.No comments:

Post a Comment