मोदींनी स्वच्छतेचे महत्व पटवुन दिले! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, September 15, 2020

मोदींनी स्वच्छतेचे महत्व पटवुन दिले!

 मोदींनी स्वच्छतेचे महत्व पटवुन दिले!

भाजपाकडुन सेवासप्ताहाचे आयोजन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः मानवी जीवनामध्ये स्वच्छतेला खूप महत्त्व आहे. त्यामुळे मानवी आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत स्वच्छता अभियान सुरु करुन, देशाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. स्वच्छतेतून समृद्धीकडे वाटचाल होत असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शहर भाजपाच्यावतीने सेवासप्ताहाचे आयोजन करुन सामाजिक उपक्रम राबविले जात आहे. यामध्ये रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, फळ वाटप तसेच दिव्यांगांना मदत असे उपक्रम हाती घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले. भाजप मध्य मंडलाध्यक्ष अजय चितळे यांनी नेहमीच सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याचे काम केले, असे प्रतिपादन भाजपा शहर जिल्हा प्रभारी मनोज पांगारकर यांनी केले.
यावेळी बोलताना महापौर वाकळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत स्वच्छता अभियान सुरु करून समाजाला एक स्वच्छतेचा संदेश देण्याचे काम केले आहे. अहमदनगर महानगरपालिकेने स्वच्छता अभियानामध्ये भाग घेऊन स्वच्छतेच्या माध्यमातून 3 स्टार मानांकन मिळवून देण्याचे काम सर्व नगरकरांनी, अधिकारी व कर्मचार्‍यांनी केले आहे. या मानांकनामुळे नगरचे नाव देशपातळीवर घेतले गेले. स्वच्छतेतून निरोगी आरोग्याकडे वाटचाल करण्याचे काम आम्ही केले. नगर शहर कचराकुंडी मुक्त करण्याचे काम केले असल्याचे ते म्हणाले. यावेळी भैय्या गंधे म्हणाले की, आज नगर शहरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवसप्ताहाचे आयोजन केले आहे. शहरातील विविध भागांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये मध्य मंडल, केडगाव, धर्माधिकारी मळा, तसेच भिंगार शहर आदी ठिकाणी स्वच्छतेचे कार्यक्रम घेण्यात आले. सात दिवस दररोज वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत, असे ते म्हणाले. अजय चितळे यावेळी म्हणाले की, भाजप पक्षाच्यावतीने राबविले जात असलेले विविध सामाजिक उपक्रम मध्य मंडलामध्ये नागरिकांच्या सहकार्याने पार पाडले जात आहे. सामाजिक उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम होत असते. दैनंदिन जीवनामध्ये स्वच्छतेला प्रत्येक नागरिकाने महत्त्व देणे गरजेचे आहे. स्वच्छतेमुळे मानवी जीवन निरोगी राहण्यास मदत होते, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह कार्यक्रमांतर्गत शहर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी गाडगीळ पटांगण येते स्वच्छता अभियानत सहभागी भाजपा शहर जिल्हा प्रभारी मनोज पांगारकर, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालनताई ढोणे, शहर जिल्हाध्यक्ष महेंद्रभेय्या गंधे, अँड. विवेक नाईक, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, मध्यमंडलाध्यक्ष अजय चितळे, नगरसेविका सोनाली चितळे, अजय ढोणे, सूरज शेळके, दीपकगांधी, पुष्कर कुलकर्णी आदी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment