शिवसेनेच्यावतीने स्व.मिनाताई ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, September 7, 2020

शिवसेनेच्यावतीने स्व.मिनाताई ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन

 शिवसेनेच्यावतीने स्व.मिनाताई ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन

मिनाताई ठाकरे महिलांसाठी प्रेरणास्थान होते ः सुरेखाताई कदम


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामागे खंबीरपणे उभे राहून त्यांच्या कार्यात मीनाताई ठाकरे यांनी मोठे योगदान दिले आहे. शिवसेना स्थापनेपासून त्यांनी पक्षासाठी मोठे बलिदान दिले. शिवसैनिक व त्यांच्या कुटूंबियांना विचारपुस करुन त्यांनी नेहमीच त्यांच्या अडचणी सोडविल्या. त्यामुळे शिवसैनिकांची त्यांच्यावर मोठी श्रद्धा होती.
महिलांसाठी त्या प्रेरणा होत्या. त्यांचा जीवनपट हा आदर्शवत असाच आहे, असे प्रतिपादन माजी महापौर सुरेखाताई कदम यांनी केले.शिवसेनेच्यावतीने स्व.मिनाताई ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी महापौर सुरेखाताई कदम, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक अनिल शिंदे, गटनेते संजय शेंडगे, नगरसेवक गणेश कवडे, सचिन शिंदे, दत्ता कावरे, शाम नळकांडे, विजय पठारे, बबलू शिंदे, संग्राम कोतकर, प्रशांत गायकवाड, दिपक खैरे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा आशाताई निंबाळकर, शहराध्यक्षा अरुण गोयल, दिपाली आढाव आदि.याप्रसंगी अनिल शिंदे, म्हणाले, शिवसेना पक्ष सर्वसामान्यांच्या पक्ष म्हणून मानला जातो, महिलांच्या प्रश्नांसाठी शिवसेनेने नेहमीच पुढाकार घेतला आहे, याची प्रेरणा ही मीनाताई ठाकरे या होत्या. त्यामुळे महिलांसाठी त्या मोठा आधार वाटत. त्यांचे कार्य आपण नेहमीच लक्षात ठेवून कार्य करावे, असे आवाहन केले.कार्यक्रमास घनश्याम घोलप, विष्णू थोरात, सोनू सैंदाणे आदिंसह शिवसैनिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment