स्थायी समिती सभापती निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, September 18, 2020

स्थायी समिती सभापती निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर

 स्थायी समिती सभापती निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर

21 जूनपासून अर्ज भरण्यास सुरुवात


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः  महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी निवडणूक कार्यक्रम पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जाहीर केला आहे. 21 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे.चर्चा, बैठकांना सुरुवात झाली आहे. नगरविकास सचिव तडवी यांनी सांगितले की
जिल्हाधिकारी कार्यालयातून ऑनलाईन प्रक्रियेद्वारे निवडणूकीची प्रक्रिया पार पडणार आहे. एकापेक्षा जास्त उमेदवार शिल्लक राहिल्यास मतदान प्रक्रीयाही ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. अर्ज माघारीची प्रक्रीयाही ऑनलाईनच होणार आहे. असेही ते म्हणाले. दि.21 ते 24 सप्टेंबर 2020 या कालावधीत सकाळी 11 ते 1.30 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज वितरण व दाखल करण्याची ऑनलाईन प्रक्रिया पार पडणार आहे. 25 सप्टेंबर रोजी निवडणूक विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. सकाळी 11 वाजता सभा सुरु झाल्यानंतर प्राप्त अर्ज पीठासीन अधिकारी यांच्याकडे सादर होणार असुन   सकाळी 11.10 वाजता उमेदवारी अर्जांची छाननी होईल. छाननीनंतर अर्ज माघारीसाठी 15 मिनिटे मुदत  देण्यात येणार असुन छाननीनंतर वैध उमेदवारांची नावे जाहीर केली जातील.एकापेक्षा जास्त उमेदवार शिल्लक राहिल्यास ऑनलाईन मतदान प्रक्रीया पार पडुन विजयी सभापतींचे नाव जाहीर होईल.


No comments:

Post a Comment