आ.निलेश लंके यांच्या उपस्थितीत मोहटादेवी विकास आराखडा बैठक संपन्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, September 4, 2020

आ.निलेश लंके यांच्या उपस्थितीत मोहटादेवी विकास आराखडा बैठक संपन्न

 आ.निलेश लंके यांच्या उपस्थितीत मोहटादेवी विकास आराखडा बैठक संपन्न


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार जन सेवेत व्यस्त असतात, गोरगरीब जनतेवर जशी त्यांची श्रद्धा आहे तशी श्रद्धा माता मोहटादेवी, वैष्णोदेवी सह महाराष्ट्रातील अनेक धार्मिक ठिकाणी वेळोवेळी जाऊन दर्शन घेण्यातही निलेश लंके हे आघाडीवर असतात. गेले काही वर्षापासून पारनेर नगर तालुक्यातील लाखो महिला भाविक भक्तांना मोफत देवदर्शन घडवणारे निलेश लंके हे सर्वश्रुत आहेत .
अनेक सभांमध्ये मी माता मोहटादेवीच्या कृपाआशीर्वादाने आमदार झालो आहे.व मला सामाजिक कामाची प्रेरणा मोहटादेवीच्या कृपेने मिळाली असून माझ्या आमदारकीच्या काळात येथे राज्य शासनाच्या विविध योजना राबवून या परिसराचे नंदनवन करून राज्यात आगळे वगैरे दैदिप्यमान असे मोहटादेवी मंदिर नावारूपाला यावे यासाठी मी प्रयत्नशील राहील,असे प्रतिपादन पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी केले आहे.
गुरुवारी श्री.क्षेत्र मोहटादेवी गडावर आमदार निलेश लंके यांनी गडाच्या विकास कामाच्या संदर्भात आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. त्यावेळी आमदार लंके यांच्या समवेत गोकुळ दौंड, संस्थेचे विश्वस्त भीमराव पालवे,विक्रम दहिफळे, अशोक दहिफळे,आदिनाथ आव्हाड, महादेव दहिफळे, पंचायत समितीचे उपअभियंता रामकृष्ण सरोदे,सुभाष केदार यांच्यासह मोहटादेवी मंदिर ट्रस्टचे अनेक सदस्य, पाथर्डी तालुक्यातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार निलेश लंके म्हणाले की, माझ्या पाच वर्षांच्या कार्यकाळात मोहटा देवीच्या परिसराचा जास्तीत जास्त विकास कामे मी करणार असून, त्याचा विकास आराखडा राज्य सरकारकडे पर्यटन विकास असो किंवा तीर्थक्षेत्र विकास त्यांच्यापर्यंत या विकास कामाच्या आराखड्याचा पाठपुरावा करण्याचा मी प्रयत्न करेल,राज्याच्या मंत्रिमंडळात अजित दादा पवार हे कार्यक्षम उपमुख्यमंत्री लाभल्यामुळे भक्तनिवास,घाटरस्ता, घनकचरा व्यवस्थापन या विकास कामांसाठी आपल्याला जेवढ्या योजने मधून निधी मिळवता येईल तो मिळवू मात्र सध्या कोरोनाचे संकट असल्यामुळे निधीची खूप कमतरता आहे.आमदार निधीही ही शासनाने बंद केला आहे.मात्र पुढील वर्षात येथे प्रत्यक्ष विकास कामे सुरू होतील त्यासाठी मी प्रयत्नशील असेल. मी  पारनेर नगरचा आमदार असलो तरी देवीने मला  कामे करण्यासाठीच आमदार केले आहे. आपल्या देवस्थान संदर्भातल्या कुठलीही समस्या असू द्या त्या निसंकोचपणे मला सांगत चला या देवस्थान समितीचा सेवक समजून मी ते पूर्ण करी असे आमदार निलेश लंके म्हणाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे विश्वस्त डॉक्टर ज्ञानेश्वर दराडे यांनी केले तर मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी आभार मानले .

No comments:

Post a Comment