सफाई कर्मचार्‍यांनी कोरोना काळात केलेले काम कौतुकास्पद - धनंजय जाधव - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, September 7, 2020

सफाई कर्मचार्‍यांनी कोरोना काळात केलेले काम कौतुकास्पद - धनंजय जाधव

 सफाई कर्मचार्‍यांनी कोरोना काळात केलेले काम कौतुकास्पद - धनंजय जाधव

नगर जल्लोषच्यावतीने मनपा सफाई कर्मचार्‍यांचा सत्कार



नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः सामाजिक जाणिवेतून संत गाडगेबाबा यांना स्वच्छतेची मशाल हाती घेऊन शहर व गावोगावी जाऊन हातात झाडू घेऊन स्वच्छता करीत असे व समाजामध्ये जनजागृती करत होते. नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटावे, म्हणून कीर्तनाद्वारे सांगत असे. समाजाचे आरोग्य अबाधित राहण्याचे काम आता मनपा सफाई कर्मचारी दररोज पहाटे कुठलाही खंड न पडता करत आहेत.
तोफखाना परिसरातील सफाई कर्मचारी कोरोना संसर्ग विषाणूच्या काळामध्ये कॅन्टोन्मेंट झोन असतानाही आपल्या आरोग्याची पर्वा न करता नागरिकांना धीर देत प्रभागातील स्वच्छता करीत होते. कोरोनाच्या काळामध्ये नागरिक भयभीत झाला आहे. परंतु आरोग्य कर्मचारी आपला जीव धोक्यात आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडत आहेत. नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे, हाच त्यांचा उद्देश आहे. नगर जल्लोषने मनपा सफाई कर्मचार्‍यांची सामाजिक भावनेतून त्यांचा सत्कार करून सन्मानपत्र देण्याचा उपक्रम उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन मा. नगरसेवक अँड. धनंजय जाधव यांनी केले.अहमदनगर मनपाचे तोफखाना भागातील सफाई कर्मचार्‍यांचा नगर जल्लोषच्यावतीने सत्कार करुन सन्मानचिन्ह देताना मा. नगरसेवक अँड. धनंजय जाधव. समवेत अध्यक्ष सागर बोगा, सागर सुरपुरे, स्वच्छता निरीक्षक बाळासाहेब विधाते, राजेंद्र सामल, राजू पठाडे, संतोष वैरागर, गोरख भालेराव व सफाई कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अँड. जाधव म्हणाले की, तोफखाना भागामध्ये कोरोना संसर्ग विषाणूचा प्रादर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यावेळी या भागातील नागरिक भयभीत झाले होते. मात्र सफाई कर्मचार्‍यांनी प्रभागातील नागरिकांना धीर देण्याचे काम केले होते. तसेच प्रभाग स्वच्छ ठेवण्याचे काम, सफाई कर्मचारी हा प्रत्यक्ष आपआपली जबाबदारी पार पाडत असतो. त्यांचा सन्मान होणे तितकेच महत्त्वाचे आहे. मी सर्व सफाई कर्मचार्‍यांचा आभारी असल्याचे ते म्हणाले. यावेळी ट्रस्टचे रत्नाकर श्रीपत, अजय म्याना, संतोष दरांगे, सचिन बोगा, अक्षय आंबेकर, सुनील मानकर, राकेश बोगा, गणेश साली, दीपक गुंडू, रोहित लोहार, महेश बल्ला, निलेश मिसाळ, योगेश म्याकल,आदींनी परिश्रम घेतल्याचे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment