हॉस्पिटलमध्ये काम करणारा प्रत्येकजण देवदूतच-आ. जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, September 18, 2020

हॉस्पिटलमध्ये काम करणारा प्रत्येकजण देवदूतच-आ. जगताप

 हॉस्पिटलमध्ये काम करणारा प्रत्येकजण देवदूतच-आ. जगताप

बूथ हॉस्पिटलला संगणक संचाची भेट


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकजण पुढे येऊन आपापल्या परीने सामाजिक भावनेतून मदत करीत आहेत. येथील बूथ हॉस्पिटलने कोरोनाच्या संकट काळात चांगले काम केले आहे. समाजातील अनेक हात मदतीसाठी पुढे येत आहेत. लुंकड व वधवा परिवाराने बूथ हॉस्पिटलला संगणक संचाची भेट दिली असून, त्या माध्यमातून येथील काम अधिक गतीने होण्यास मदत होईल. सध्याच्या संकट काळात बूथ हॉस्पिटलचे काम स्पृहणीय आहे. हॉस्पिटलमध्ये काम करणारा प्रत्येकजण देवदूतच आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील बूथ हॉस्पिटलला नगरचे लुंकड व शेवगावचे वधवा यांच्यावतीने संगणक संच आ. जगताप यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी दिलीप लुंकड, अजय ढोणे, कचरदास लुंकड, पियुष लुंकड, चेतन गोधडे, निखील ढोणे, चरण गिते, प्रवीण कोठारी, राहुल उन्हाळे, बाळासाहेब दहिहंडे, दिपेश लुंकड, सचिन वधवा, मेजर कळकुंबे, डॉ. अभिजीत केकाण, प्रशांत गायकवाड, सचिन शिरसाठ, लक्ष्मण शिंदे, अमित पंडित, अविनाश अकोलकर, आरोग्यमित्र सुनील राहिंज आदी उपस्थित होते.
आ. जगताप पुढे म्हणाले की, वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे अनेक कोरोना यौद्धे कोविड रुग्णांची सेवा करीत आहेत. समाजातील अनेकजण त्यांच्या सेवेचा गौरव करीत आहेत. खर्या अर्थाने प्रत्येकाने सलाम करावा, अशीच या आरोग्य सेवेत काम करणार्यांची सेवा आहे. रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. यामागे हे देवदूतच आहेत. त्यांच्या सेवेमुळेच हे शक्य होत आहे, असे ते म्हणाले.दिलीप लुंकड म्हणाले की, समाजाचे आपण काही तरी देणे लागतो, ही भावना प्रत्येकाने मनात जागृत ठेवून पुढे आले पाहिजे. लुंकड व वधवा परिवाराने यासाठीच मदतीचा हात पुढे करीत बूथ हॉस्पिटलला संगणक संचाची भेट दिली आहे. सद्य परिस्थितीत गरज असलेल्या रुग्णालयांना मदत करण्यासाठी समाजबांधवांनी पुढे आले पाहिजे, असे सांगितले.
अजय ढोणे म्हणाले की, मागील सहा महिन्यांपासून संपूर्ण जग कोरोनाशी मुकाबला करीत आहे. अशा परिस्थितीत गरज ओळखून त्यानुसार समाजासाठी प्रत्येकाने काही तरी केले पाहिजे. सामाजिक भावनेतूनच आजची ही मदत आम्ही केली आहे. आरोग्य सेवेत काम करणार्या देवदूतांमुळेच खर्या अर्थाने अनेकांना जीवनदान मिळत आहे. गरज ओळखून आम्ही मदत केली असून, संगणकाच्या माध्यमातून काम अधिक जलद गतीने होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.
मेजर कळकुंबे म्हणाले की, समाजहितासाठी विविध सामाजिक संस्था पुढे येऊन सद्य परिस्थितीत काम करीत आहेत. सर्वांनी शासनाच्या नियमांचे पालन केल्यास त्याचा चांगला परिणाम दिसून येईल. बूथ हॉिस्पिटलच्या माध्यमातून अधिकाधिक चांगली रुग्णसेवा दिली जात आहेत. सर्वांच्या सहकार्यातून आपण कोरोनावर मात करू.

No comments:

Post a Comment