मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेत्यांनी वाहिली अनिल राठोडांना श्रध्दांजली! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, September 7, 2020

मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेत्यांनी वाहिली अनिल राठोडांना श्रध्दांजली!

 मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेत्यांनी वाहिली अनिल राठोडांना श्रध्दांजली!

राठोड शिवसेनेचा ढाण्या वाघ ः उद्धव ठाकरे

यारो का यार आपल्यातून निघून गेला ः फडणवीस


अनिल राठोड हे सर्वसामान्यांचे भैया होते. त्यांचे अचानक जाणे धक्कादायक होते. मी व अनिल राठोड मॅजेस्टिक आमदार निवासात समोरासमोर रहायचो. ते ‘यारो का यार’ असे व्यक्तीमत्त्व होते.नगरमध्ये त्यांनी शिवसेनेचे शहरप्रमुख, जिल्हाप्रमुख अशा जबाबदार्या पार पाडल्या. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कितीही मोठा संघर्ष करण्याची त्यांची तयारी असायची. 25 वर्षे ते आमदार होते. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी गरजूंसाठी अन्नछत्र सुरु केले होते. मी भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून नगरला गेलो असता ते माझ्या स्वागतासाठी शिवसैनिकांसह रस्त्यावर उभे होते. माझा मित्र एवढ्या मोठ्या पक्षाचा अध्यक्ष झाला, असा त्यांना आनंद असायचा. माझे व त्यांचे खूप चांगले ऋणानुबंध होते.

- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

मुंबई : माजी मंत्री दिवंगत अनिल राठोड यांना विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.माजी आमदार शिवसेना उपनेते अनिल राठोड हा शिवसेनेचा ढाण्या वाघ होताअस म्हणुन त्यांनी राठोड यांच्या कार्याचा गौरव केला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शोकप्रस्ताव मांडला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले की, माझा अजूनही विश्वास बसत नाही की अनिल राठोड यांना श्रध्दांजली वाहवी लागतेय. राठोड हे शिवसेनेचे कट्टर सैनिक होते. राजस्थानहून महाराष्ट्रात आलेल्या राठोड यांनी नगरमध्ये कोणतीही मोठी संस्था, कारखाना पाठीशी नसताना पावभाजी, ज्युसची गाडी लावून काम केले. हे काम करतानाच ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित  झाले. त्यांच्याही ध्यानीमनी नसेल की ज्युसच्या गाडीवाला माणूस आमदार, मंत्री होईल. पण विचारांशी बांधिलकी व निष्ठा असल्याने त्यांनी ढाण्या वाघाप्रमाणे काम केले. अनेकदा व्यासपीठावरही त्यांचा मोबाईल वाजायचा व त्याव्दारे ते जनतेची कामे करीत असत. एक चळवळ्या, झुंजार व निष्ठावान कार्यकर्ता आपल्यातून निघून गेला. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.No comments:

Post a Comment