तरूणीवर झाडल्या गोळ्या; स्वतःचेही जीवन संपवले! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, September 15, 2020

तरूणीवर झाडल्या गोळ्या; स्वतःचेही जीवन संपवले!

 तरूणीवर झाडल्या गोळ्या; स्वतःचेही जीवन संपवले!

तू ही मेरी किरण... प्रेमात नकार...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः शाहरुख खान जुही चावलाचा 1993 मध्ये डर नावाचा हिंदी चित्रपट आला होता. एकतर्फी प्रेमात पागल झालेला तरुण तू ही मेरी किरण म्हणून तिला प्रपोज करत असताना विकृतीचे दर्शन घडवत होता. तसाच प्रकार राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे घडला असून 25 वर्षीय तरुणीच्या घरामध्ये पहाटेच्या सुमारास घुसून तीस वर्षीय तरुणाने तरुणीवर गोळी झाडून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःच्या डोक्यामध्ये गोळी झाडून आपली जीवनयात्रा संपवण्याचा देखील प्रयत्न केला. परंतु सुदैवाने तरुणीच्या डोक्याला गोळी घासून गेल्यामुळे ती किरकोळ जखमी झाली आहे. मात्र तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
मंगळवारी पहाटे पावणे सहा वाजण्याच्या सुमारास तरुणीच्या मागील बंगल्याच्या दरवाजामधून विक्रम रमेश मुसमाडे याने त्याच्या अन्य एका साथीदारांसह प्रवेश केला. यावेळी स्वयंपाक गृह मध्ये ही तरुणी झाडत झाडलोट करत होती. यावेळी विक्रम यांनी तिला विचारले की तू माझ्यावरती प्रेम का ? तरुणीने माझे तुझ्यावरती प्रेम नाही असे  सांगताच विक्रम यांनी कमरेला लावलेली बंदुक काढून एक गोळी झाडली.यावेळी बंदुकीमधून गोळी सुटली होती. ती या तरुणीच्या डोक्याला घासून गेली. जखमी अवस्थेत तिने आपल्या चुलत्यास मोबाईलवरून संपर्क साधून घटनेची माहिती दिली. तोपर्यंत विक्रम मुसमाडे यांनी स्वतःच्या डोक्यात बंदूक लावून गोळी झाडली. आणि त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. यावेळी स्वयंपाक ग्रुपमध्ये रक्ताचे थारोळे साचले होते. बंदुकीच्या गोळीचा आवाज ऐकून आसपासच्या शेजारी राहणारे नागरिकांनी या ठिकाणी धाव घेतली. विक्रम मुसमाडे यांच्या मित्रांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने विक्रम यांना प्रवरा ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्याच्या वरती उपचार सुरु  असतानाच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर दिपाली काळे, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल, सहाय्यक फौजदार पोपट  टिकल, पोलीस नाईक वाल्मीक पारधी, पोलीस कॉन्स्टेबल गणेश फाटक आदींनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेने देवळाली परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.


No comments:

Post a Comment