कृषीदूत विशाल जगताप यांचे मातीपरिक्षणा विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शण.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, September 22, 2020

कृषीदूत विशाल जगताप यांचे मातीपरिक्षणा विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शण..

 कृषीदूत विशाल जगताप यांचे मातीपरिक्षणा विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शण..


नगरी दवंडी/प्रतिनिधी
जामखेड ःमहात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण(कृषी)जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यक्रमांतर्गत सोनई येथील कृषी महाविद्यालयातील अंतिम वर्षातील कृषिदूत जगताप विशाल मारुती हा जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथे विविध उपक्रम व प्रत्येक्षिकाचे आयोजन करत आहे.
शेतकऱ्यांसाठी मातीपरिक्षणाचे महत्त्व, माती नमुना संकलनाची शास्वत शेती,खत व्यवस्थापणासाठी होणारा फायदा व काही माती नमुने प्रात्यक्षिक स्वरूपात घेण्यात आले.
या वेळी फक्राबाद गावातील सरपंच मा श्री विश्वनाथ राऊत व इतर मान्यवरांनी पथकाने स्वागत करून सत्कार केला.तसेच फक्राबाद गावचे प्रगतशील शेतकरी श्री मिठू राऊत, स्वप्नील भांडवळकर,आशा राऊत,केशव भंडारी, हिराबाई राऊत,कृष्णा उबाळे, आशुतोष राऊत,रमेश जगताप प्रभात भुजबळ उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ.एच जी मोरे, कार्यक्रम अधिकारी प्रा ए. डी. दरंदले व प्रा. वाघमारे आदींचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment