चांगल्या संघटनांसाठी विचारांची देवाण-घेवाण जरुरी ः नगरसेविका जाधव - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, September 3, 2020

चांगल्या संघटनांसाठी विचारांची देवाण-घेवाण जरुरी ः नगरसेविका जाधव

 चांगल्या संघटनांसाठी विचारांची

देवाण-घेवाण जरुरी ः नगरसेविका जाधव

नगरी दवंडी /प्रिंतनिधी

अहमदनगर ः समाजातील शिक्षक हा महत्वाचा घटक आहे, देशाची भावी पिढी घडविण्याचे काम शिक्षक करत असतात. त्यामुळे शिक्षकांचा नेहमीच आदर केला पाहिजे. आज कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शाळा जरी बंद असल्या तरी शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन सह वेगवेगळ्या माध्यमातून शिक्षण देत आहेत. विद्यार्थ्यांप्रती आपले कर्तव्य बजावत आहेत. अशा शिक्षकांचे संघटन चांगले असेल तर विचारांची देवाण-घेवाण होऊन चांगले कार्य होवू शकते. शिक्षक संघाचे नूतन पदाधिकारी  हे समाजाभिमुख आहे. त्यामुळे आपल्या कर्तव्याबरोबर समाजासाठी आदर्शवत काम करत आहे. संघटनेच्या माध्यामातून ते आपले काम यापुढेही करत राहतील, असा विश्वास नगरसेविका सुवर्णा जाधव यांनी व्यक्त केला.
नगर तालुका शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी महेश भनभणे यांची तर नूतन कार्याकारिणीचा सत्कार नंदनवन मित्र मंडळाच्यावतीने करण्यात आला. याप्रसंगी नगरसेविका सुवर्णा जाधव, समता परिषद अध्यक्ष दत्ता जाधव, लक्ष्मी जाधव, बापूसाहेब तांबे, संतोष दुसुुंगे, रवी जाधव, ऋषीकेश जाधव, गणेश औशिकर, राज जाधव, विशाल गायकवाड, आदिनाथ सातपुते, अंतोन पवार, सुजाता पुरी, वसंत शिंदे, सविता गोरे, चंद्रकला कोतकर, शोभा जाधव आदि उपस्थित होते.
यावेळी सत्काराला उत्तर देतांना महेश भनभणे म्हणाले, आपण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे केले पाहिजे. विद्यार्थी हा सक्षम झाला पाहिजे. त्यासाठी शिक्षक काम करत आहेत. संघाच्या माध्यमातून विद्यार्थी - शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघ काम करत आहेत. नूतन पदाधिकारी हे संघाच्या माध्यमातून शाळांचे व शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करेल. आज केलेल्या सत्कारामुळे आम्हाला काम करण्यास प्रोत्साहन मिळणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी दत्ता जाधव म्हणाले, शिक्षक संघाचे पदाधिकारी संघाच्या माध्यमातून चांगले काम करतील. त्यांच्या कार्यात नंदनवन मित्र मंडळाच्यावतीने सहकार्य केले जाईल, असे सांगितले. यावेळी संभाजी आढाव, बाळासाहेब चाबुकस्वार, विजय नरवडे, रणजित कुलाळ, बापू बोरुडे, नितीन पंडित, संतोष गवळी, हेमंत भागवत, आबा ठाणगे, बजरंग बांदल आदिंचा सत्कार करण्यात आला. शेवटी ऋषीकेश जाधव यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment