शहरातील पत्रकार, वृत्तछायाचित्रकारांचा कोरोना योध्दा म्हणून सन्मान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, September 28, 2020

शहरातील पत्रकार, वृत्तछायाचित्रकारांचा कोरोना योध्दा म्हणून सन्मान

 शहरातील पत्रकार, वृत्तछायाचित्रकारांचा कोरोना योध्दा म्हणून सन्मान

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः शहर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीप चव्हाण यांच्या वतीने युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सत्यजीत तांबे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. शहरातील पत्रकार, वृत्त छायाचित्रकार व माध्यमांचे प्रतिनिधी यांना कोरोना योध्दा सन्मानाने गौरविण्यात आले.

शहर काँग्रेस कार्यालयात प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीप चव्हाण, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, ज्येष्ठ पत्रकार अशोक सोनवणे, युवकचे शहराध्यक्ष मयुर पाटोळे, इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे अध्यक्ष उमेर सय्यद उपस्थित होते.
   शिवाजी शिर्के म्हणाले की, जिल्ह्याला पत्रकारितेचा मोठा वारसा आहे. जिल्ह्याच्या विकासात्मक वाटचालीत अनेक पत्रकारांनी योगदान दिले असून, कोरोना सारख्या महामारीत देखील पत्रकारांनी आपले कर्तव्य पार पाडले आहे. सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली दीप चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष वाढीसाठी योगदान दिले असून, सामाजिक भावनेने त्यांचे कार्य चालू आहे. पत्रकारांचा सन्मान करुन त्यांना आनखी कार्य करण्यासाठी त्यांना एक प्रकारे प्रोत्साहन देण्याचे काम केल्याचे त्यांनी सांगितले.
   संदीप मिटके यांनी पोलीस, पत्रकार व राजकीय व्यक्ती आपल्या परीने चांगले कार्य करीत असतात. ते देखील मनुष्य असून, त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टीने पहाण्याची गरज आहे. वृत्तपत्रांवर विश्वासार्हता टिकून असून, पत्रकारिता क्षेत्रात मोठा बदल घडत आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांसह समाज माध्यम देखील प्रभावी बनत आहे. पत्रकारांप्रमाणे समाज देखील जाब विचारु लागला असल्याने पत्रकारिता क्षेत्र व्यापक बनत चालल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. प्रास्ताविकात दीप चव्हाण यांनी युवकचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी टाळेबंदी काळात अनेक गरजूंना आधार देण्याचे कार्य केले. कॅन्सरग्रस्त बालकाला उपचारासाठी दुसर्‍या राज्यात घेऊन जाण्याकरिता त्यांनी पोलीस विभागाकडून विशेष परवानगी मिळवून दिल्याचे सांगून त्यांच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. तर कोरोनाच्या संकटकाळात पत्रकारांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. समाजाला जागृक करुन दिशा देण्याचे कार्य पत्रकारांनी केले. कोरोना योध्दांची भूमिका त्यांनी बजावली असून, त्यांचा सन्मान करण्यासाठी हा उपक्रम राबविले असल्याचे देखील त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते पत्रकार, संपादक, वृत्त छायाचित्रकार व माध्यमांचे प्रतिनिधी यांना कोरोना योध्दा सन्मान पत्र व संरक्षक किट देऊन सत्कार करण्यात आला. पाहुण्यांचे स्वागत किरण काळे यांनी केले. आभार मयुर पाटोळे यांनी मानले.

No comments:

Post a Comment