स्वराज्य कामगार संघटनेची नवीन कायदाविरोधात निदर्शने... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, September 28, 2020

स्वराज्य कामगार संघटनेची नवीन कायदाविरोधात निदर्शने...

 स्वराज्य कामगार संघटनेची नवीन कायदाविरोधात निदर्शने...

केंद्र सरकारने कामगार कायद्यातील घेतलेले निर्णय मागे घ्यावेत - योगेश गलांडे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कामगारांचे हक्क व कामगारांची चळवळ मोडीत काढण्यासाठी केंद्र सरकारने संसदेमध्ये पावसाळी अधिवेशनात कामगारविरोधी चुकीचा कायदा पारीत करुन मंजुर करून घेतला आहे. या चुकीच्या निर्णयामुळे कामगारांचे मोठे नुकसान होणार आहे. या कायद्यामुळे कामगारांचे हक्क हिसकावून घेतले जाणार आहे. तसेच कामगार कायद्याची पायमल्ली होणार आहे. तरी केंद्र सरकारने कामगार कायद्यामध्ये घेतलेले निर्णय मागे घेण्यात यावे, अशी मागणी स्वराज्य कामगार संघटनेचे अध्यक्ष योगेश गलांडे यांनी केली.
    जिल्हाधिकारी कार्यालय येथे खासगी कंपन्यातील कर्मचार्‍यांचे अधिकार कमी करणारे विधेयक परत घ्यावे, यासाठी स्वराज्य कामगार संगटनेच्यावतीने निदर्शने करण्यात आले या प्रसंगी ते बोलत होते.  श्री गलांडे पुढे म्हणाले की केंद्र सरकारने देशामध्ये कामगार कायदा अंमलात आणण्यासाठी कुठल्याही कामगार संघटनेबरोबर बैठक न लावता व विचारात न घेता हे कामगारविरोधी धोरण सरकारने लादले आहे. हा कायदा कामगारांसाठी अहितकारक व धोकादायक धोरण आहे. यापुढे हे बील जरी पास झाले असले तरी कामगार वर्गामध्ये संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय उद्योजकांच्या फायद्याचा व कामगारांच्या तोट्याचा आहे. तेव्हा त्याचा विरोध म्हणून सर्व कामगार संघटना लढाई करण्यास तयार आहे. तरी केंद्र सरकारने याची दखल घ्यावी. अंमलात आणलेला कामगार कायदा परत घ्यावा. कामगार हा देशाच्या जडणघडणीमधला महत्त्वाचा घटक आहे. कामगारा शिवाय उद्योग क्षेत्राला भरारी येणार नाही. कामगारांना एखाद्या कारखान्यात त्यांच्या न्याय व हक्कासाठी संप करण्यासाठी 14 दिवस आधी नोटीस द्यावी, अशी कायद्यात तरतूद होती. परंतु आता नवीन कायद्यानुसार नोटीस देण्याचा कालावधी 60 दिवसांचा केला आहे. त्यामुळे संप करणार्‍यांवर मर्यादा व अडचणी निर्माण झाल्या आहेत. एखाद्या कारखान्यात 300 कामगार कायमस्वरुपी असणार्‍या कारखानदाराला त्या कामगाराला कंत्राट बेसवर ठेवण्याची मुभा नवीन कायद्यानुसार देण्यात आली आहे. त्यामुळे कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. तरी केंद्र सरकराने या कामगार कायद्याचा पुनर्विचार करून बदल करण्यात यावा, असेही ते म्हणाले. यापृसंगी सुनील गायकवाड, स्वप्निल खराडे, भाऊ जाधव, विकास केकाण, अमोल उगले, कचेश्वर सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment