‘कोरोना हारेल देश जिंकेल’ या आशेवर प्रयोगशाळा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, August 21, 2020

‘कोरोना हारेल देश जिंकेल’ या आशेवर प्रयोगशाळा

‘कोरोना हारेल देश जिंकेल’ या आशेवर प्रयोगशाळा

                 वैज्ञानिक अधिकारी देताहेत कोरोनाशी लढा!


पारनेर तालुक्यामध्ये कोरोना चा संसर्ग सध्या वाढत आहे मात्र या परिस्थितीत वैज्ञानिक अधिकारी कर्मचारी हे आपल्या कामाला पूर्ण न्याय देत आहेत कोणत्याही परिस्थितीवर मात करून कोरोना शी लढत आहेत हे करत असताना आपल्या स्वतःला किंवा कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण होण्याची भीती असते तर काही कर्मचार्‍यांना कोरोना ची लागण ही झाली त्यातून ते सावरले व पुन्हा त्यांनी कामावर हजेरी लावली त्यामुळे या सर्वांच्या सहकार्याने तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांना सेवा देण्याचे काम करण्यात प्रशासकीय यंत्रणेला यश येत आहे

सध्या तालुक्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना चे रुग्ण वाढत आहेत या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची आपण त्वरित तपासणी करतो त्यांचे स्राव नमुने घेतो रॅपिड चाचणी करतो हे करण्याचे बहुतांशी काम प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी करत असतात अनेक वेळा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात येत असतात त्यामुळे त्यांना कोरोना संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो तरीही हे जिवाची बाजी लावून काम करत आहेत त्यांच्या या कामामुळे रुग्ण लवकर शोधण्यास मदत होत आहे
- डॉ.प्रकाश लाळगे, आरोग्य अधिकारी पारनेर


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः कोरोना सुरू झाल्या पासून मार्चपासून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे व तहसीलदार ज्योती देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालय टाकळी ढोकेश्वर ग्रामीण रुग्णालय पारनेर प्राथमिक आरोग्य केंद्र रुई छत्रपती भाळवणी व आळकुटी येथील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी आहेत ते सध्या त्यांचे आरोग्य केंद्राचे काम संभाळून पारनेर येथे कोव्हिड-19 सेंटरला रुग्णाचे स्राव घेण्याचे काम करत आहेत
पारनेर तालुक्यात बाधितांची संख्या ही मोठी आहे व दिवसेंदिवस वाढत आहे ही लढाई लढत असताना यंत्रणे बरोबर कंबर कसून करोना रुग्णांना बरे करण्यात महत्वाची भूमिका बजावणार्‍या पारनेर तालुक्यातील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांचा वाटा मोलाचा व मोठा आहे  वैज्ञानिक अधिकारी यांना रोगाची चाचणी करून तातडीने निदान करताना संसर्गाचा धोका त्यांना अधिक प्रमाणात आहे तो धोका पत्करून आज ते कोरोना शी लढा देत आहेत. राष्ट्रकार्य म्हणून हे सर्व कर्मचारी सध्या या रोगाशी लढत आहेत जून पासून पारनेर तालुक्यातील कोविड केअर सेंटर सुरू झाल्यापासून जवळपास 1700 हून अधिक स्वब घेण्यात आले आज पर्यंत 900 पेक्षा अधिक रुग्णांची रॅपिड टेस्ट करण्यात आले या कोरोना च्या लढाईत पारनेर तालुक्यातील जिल्हा हिवताप विभागातील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांनी स्वतःला प्रामाणिकपणे झोकून दिले आहे स्राव कलेक्शन बरोबरच व्ही टी एम लेबलिंग पॅकिंग रॅपिड आँटीजण चाचणी आर टी पीसीआर सॉफ्टवेअर मध्ये ऑनलाईन एन्ट्री अशी सर्व कामे हे योद्धे कुटुंबाची जीवाची पर्वा न करता अखंडपणे करत आहेत पारनेर मध्ये सेंटर सुरू झाल्यापासून मोठे हिमतीने अनेक अडचणींवर मात करत कोरोना हरेल देश जिंकेल या आत्मविश्वासावर हे सर्व अधिकारी कर्मचारी सध्या तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांसाठी काम करत आहेत.
सहा महिन्यापासून सलग हे अधिकारी काम करत आहेत त्यामुळे काही प्रमाणात त्यांच्या आरोग्यावर व त्यांच्यावर ताण येत आहे सध्या समूह संसर्ग होत असल्याने नागरिकांनी खबरदारी घेतली पाहिजे ज्यांना लक्षणे दिसत आहे त्यांनी त्वरित आरोग्य विभागाशी संपर्क साधला पाहिजे व आरोग्य अधिकार्‍यांना याबाबत माहिती दिली पाहिजे त्यामुळे कोरोना चा संसर्ग रोखण्यास मदत होईल व या सर्व कर्मचार्‍यांना त्यामुळे सहकार्य मिळेल तालुक्यातील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी तृप्ती बेल्हेकर अविनाश लबडे मेघना नराळ धनराज दराडे आवेश सय्यद या सर्वांसोबत शालेय आरोग्य तपासणी च्या आरोग्य सेविका फार्मासिस्ट ऑफिसर अधिकारी कर्मचारी यांचा सहभाग असतो.

No comments:

Post a Comment