सभापती दाते यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 18, 2020

सभापती दाते यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन

 सभापती दाते यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन



नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः तालुक्यातील सावरगाव परिसरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन सभापती दाते यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी ते बोलत होते.मौजे सावरगाव व पळसपुर येथील रुपये 55 लक्ष निधी असलेले विविध विकास कामांचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती काशिनाथ दाते सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यामध्ये सावरगाव येथील लेखाशीर्ष 3054 अंतर्गत 222 ते काळेवाडी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे रुपये 25 लक्ष, सन 2019 20 रस्ते दुरुस्ती अंतर्गत गोडसेवाडी मानेवाडी लांडगेवाडी रस्त्यावर सी.डी करणे रुपये 5 लक्ष ,सावरगाव येथील इंदिरा कॉलनी रस्ता काँक्रिटीकरण करणे रुपये 5 लक्ष पळसपुर ते डोंगरवाडी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे रुपये 20 लक्ष रुपये विकास कामांचे भूमिपूजन झाले   यावेळी बोलताना सभापती काशिनाथ दाते सर म्हणाले सन 2019 20 च्या निधीतून ही कामे मंजूर केलेली असून सध्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे सन 2020-21 या आर्थिक वर्षात अद्यापपर्यंत कोणत्याही विकासकामांना निधी उपलब्ध होण्याची शक्यता नाही. त्यामुळे लोकांच्या अपेक्षा असूनही उर्वरित कामे मंजूर करणे शक्य होत नाही.  म्हणून कोरोनाची  परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असून आपणा सर्वांची जबाबदारी आहे.    
यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजी शेठ बेलकर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अशोक शेठ कटारिया, सावरगाव चे सरपंच भाऊ चिकणे, पळसपुर चे सरपंच माधव शेठ पवार , काटाळवेढाचे सरपंच सुदाम गाजरे ,उपसरपंच ठका शेठ कडुसकर, शिवसेना महिला ता.उपप्रमुख सौ सुनिता आहेर, सचिन गोडसे,  शाखाप्रमुख देवराम मगर, उद्योजक बाबाजी लांडगे, रामदास ढोले, रवींद्र गायके,  आनंदा लांडगे ,म्हातारा गायखे,  नारायण गायके,  जालिंदर गायके,  नवनाथ राळे, गोरक्षनाथ बेलकर, लहू गोडसे,  नाथा लांडगे , खंडू भाईक, सावळेराम डोंगरे ,भाऊ नाना आहेर, शिवाजी शेठ आहेर, राजेंद्र डोंगरे ,सुभाष डोंगरे, संभाजी डोंगरे, इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.
  सार्वजनिक बांधकाम विभागाचे ज्युनिअर इंजिनिअर श्री जाधव, श्री महांडुळे, ग्रामसेवक भालेकर ,तसेच कामाचे ठेकेदार फारुक सय्यद, बबन वाळुंज ,अनिल तांबडे, उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी शेठ बेलकर यांनी केले. तर आभार पळसपुर चे सरपंच माधव शेठ पवार यांनी मानले.

No comments:

Post a Comment