शेतकर्‍यांचे दुध दरवाढीच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, August 17, 2020

शेतकर्‍यांचे दुध दरवाढीच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र!

 शेतकर्‍यांचे दुध दरवाढीच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र!


नगरी दवंडी /प्रतिनिधी
पारनेर ः  राज्यात दुध दरवाढीच्या मागणीसाठी विविध शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरू आहे.या आंदोलनात पारनेर तालुक्यातील शेतकरी नेते अनिल देठे पाटील हे राज्यस्तरावर माजी मंञी आ.सदाभाऊ खोत , डॉ अजित नवले यांच्यासह नेतृत्व करत असुन , राज्यात सर्वात प्रथम दुध दराबाबत त्यांनीच राज्य सरकारचे लक्ष वेधले होते.
तद्नंतर राज्यातील विविध शेतकरी संघटनांनी एकत्र येत दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती स्थापन करून 1ऑगस्ट पासुन मोफत दुध वाटप व दुग्धाभिषेक आंदोलनं केले तसेच 13 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट पर्यंत  लेटर टू सी एम  हे दुध उत्पादक शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर 15 ऑगस्ट रोजी गांजीभोयरेतील शेकडो शेतकर्‍यांनी एकञ येत  आपल्या भावना पोस्टकार्ड (पत्राद्वारे)माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना कळवल्या आहेत. यावेळी  उत्तम पांढरे, रावसाहेब झंजाड,  विनायक पांढरे, संदीप पांढरे ,आबा खणसे,  कुंडलिक देंडगे, आनंदराव झंजाड, सुभाष पांढरे, ठाकराम खोडदे,  नंदकुमार देंडगे, आयुब इनामदार ,अक्षय झंजाड,  दादाभाऊ निमोणकर आकाश खोडदे,  अंबरनाथ खणसे , आप्पा झंजाड,  चेतन खोडदे,  राज खोडदे, श्रीपती खोडदे, विठ्ठल खणसे,  शरद खोडदे,अजय भोर, अंकुश पांढरे ,लहू पांढरे ,गोटीराम झंजाड  मनोज तामखडे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते मनोज तामखडे यांनी सांगितले की आम्ही नेहमीच शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी शेतकरी नेते सुकाणु समिती महाराष्ट्र राज्य सदस्य माननीय श्री अनिलजी देठे यांच्या मार्गदर्शनाखाली शासन दरबारी शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या व्यथा मांडण्याचे काम करत असतो शेतकरी सध्या शेतीमालाला व दुधाला भाव नसल्यामुळे पूर्णपणे हतबल झाला आहे.
सध्या कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतीमालाचे पूर्णपणे नुकसान झाल्यामुळे व तीन ते चार महिन्यांपासून दुधाच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून पूर्णपणे हतबल झाला आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर अक्षरशः दुध व्यवसाय मोडकळीस येईल.

No comments:

Post a Comment