वारणवाडी येथे विविध विकास कामांचे सभापती काशिनाथ दाते यांच्या हस्ते लोकार्पण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, August 14, 2020

वारणवाडी येथे विविध विकास कामांचे सभापती काशिनाथ दाते यांच्या हस्ते लोकार्पण

वारणवाडी येथे विविध विकास कामांचे सभापती काशिनाथ दाते यांच्या हस्ते लोकार्पण


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः पारनेर येथील वारणवाडी ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोगाचे अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण जिल्हा परिषदेचे कृषी व बांधकाम समिती सभापती मा. काशिनाथ दाते सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले यामध्ये 1. वारणवाडी गावातील प्राथमिक शाळा वॉल कंपाऊंड करणे रुपये 2 लक्ष, 2. ग्रामपंचायत कार्यालयासमोर शेड बांधणे रुपये 1 लक्ष, 3. गोडसे दारा येथील प्राथमिक शाळा वॉल कंपाऊंड करणे रुपये 3 लक्ष,.   4. गणेश मंदिर परिसर पेव्हिंग ब्लॉक बसवणे रुपये 3 लक्ष,      5. गणेश मंदिर ते बिरोबा मंदिर ड्रेनेज लाईन टाकणे रुपये 3 लक्ष, असे एकूण 12 लक्ष रुपयांचे कामाचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.
सभापती काशिनाथ दाते म्हणाले वारणवाडी गावाकरिता पिण्याच्या पाण्याची रुपये 34 लक्ष निधी खर्च असलेली योजना लवकरच कार्यान्वित होईल.  त्यामुळे गावचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटलेला असेल व प्रत्येकाला घरोघरी स्वच्छ पाणी मिळेल. तसेच गावाकरिता रुपये साडेचार लक्ष निधी असलेल्या स्मशानभूमीचे काम प्रगतिपथावर असून पारदरा येथील रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करण्याकरिता रुपये 17 लक्ष निधी मंजूर केलेला असून लवकरच त्याचे काम सुरू होणार असल्याचे सभापती काशिनाथ दाते सर यांनी सांगितले. वारणवाडी गावचा विकास करण्यास कटिबद्ध असल्याची ग्वाही सभापती दाते यांनी दिली. तसेच पाणी फाउंडेशन टीम वारणवाडीचे विशेष कौतुक सभापती यांनी केले.
यावेळी वारणवाडी येथील ग्रामस्थांनी सभापती दाते यांना मागणी केली की वारणवाडी येथील सब स्टेशन वारणवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये असून त्याचा लाभ वारणवाडी गावात होत नाही. तरी यामध्ये लक्ष घालावे त्यास प्रतिसाद देऊन येथील सबस्टेशन चा लाभ वारणवाडी गावास मिळवून देण्याची ग्वाही सभापती दाते यांनी दिली. यावेळी उपसरपंच पांडुरंग काशीद ,अशोक पिंगळे, चेअरमन साहेबराव रोकडे , ग्रा.सदस्य संजय काशीद, सचिन कोकाटे ,बाबू पानमंद,विनायक पानमंद, रावसाहेब कोकाटे, संपतराव आहेर ,सुभाष ठाणगे सर ,नवनाथ पानमंद, नानाभाऊ काशीद ,विनोद काशीद,  तेजस काशीद, एकनाथ कोकाटे, पोपट काशीद, महादू बेलकर , विजय गुंड, अण्णासाहेब काशीद, ग्रामसेवक आहिरे ,सचिन बेलकर, राजू कोकाटे ,अर्जुन कोकाटे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते. तर संजय काशीद यांनी सर्वांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment