खरा खेळाडू शालेय जीवनापासून घडतो ः वाबळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, August 31, 2020

खरा खेळाडू शालेय जीवनापासून घडतो ः वाबळे

 खरा खेळाडू शालेय जीवनापासून घडतो ः वाबळे

नवनाथ विद्यालय, डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्यावतीने निमगाव वाघात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा


नगरी दवंडी/प्रतिनिधी
निमगाव वाघा ः निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालय, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्यावतीने राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. तर खेळाला प्रोत्साहन देऊन खेळाडू घडविण्याची व कोरोना महामारीशी लढा देण्याकरिता नियमांचे पालन करुन इतरांना देखील याबाबत जागृक करण्याची सामुदायिक शपथ घेण्यात आली.
नवनाथ विद्यालयात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस शाळेचे प्र. मुख्याध्यापक किसन वाबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा नगर तालुका क्रीडा समितीचे उपाध्यक्ष पै.नाना डोंगरे, निळकंठ वाघमारे, क्रीडा शिक्षक चंद्रकांत पवार, काशीनाथ पळसकर, उत्तम कांडेकर, मंदा साळवे, तुकाराम खळदकर, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे आदि उपस्थित होते.
    क्रीडा क्षेत्रात नगर जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी नावलौकिक कमवला आहे. सध्या कोरोनाचे सावट असल्याने शाळा बंद आहेत. खरा खेळाडू शालेय जीवनापासून घडत असतो. शाळेमध्ये खेळाचे बाळकडू मिळाल्यास त्याची प्रगती साधली जात असल्याने खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे कार्य केले जात असल्याची भावना प्र. मुख्याध्यापक किसन वाबळे यांनी व्यक्त केली. पै.नाना डोंगरे म्हणाले की, खेळामुळे मानसिक व शारीरिक आरोग्य चांगले राहते. कोरोनामुळे रोगप्रतिकार शक्ती उत्तम ठेवण्यासाठी उपाययोजना केले जात असून, चांगल्या आरोग्यासाठी दैनंदिन जीवनात व्यायाम महत्त्वाचा घटक आहे. मैदानी खेळाने व्यायाम होऊन आरोग्याची धनसंपदा लाभत आहे. शिवाय खेळाडूंना खेळात देखील आपले करिअर घडविता येत आहे. आवड असलेला एकतरी मैदानी खेळ खेळण्याचे त्यांनीआवाहन केले.

No comments:

Post a Comment