आ.काळे यांनी कोव्हिड सेंटरची केली पाहणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 11, 2020

आ.काळे यांनी कोव्हिड सेंटरची केली पाहणी

 आ.काळे यांनी कोव्हिड

 सेंटरची केली पाहणी


नगरी दवंडी/प्रतिनिधी

कोपरगाव ः कोपरगाव तालुक्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे सध्या एस.एस.जी.एम. महाविद्यालयासोबत लायन्स मूकबधिर विद्यालय व आत्मा मलिक संकुलात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. लायन्स मूकबधिर विद्यालयात 62 बेडची सोय असून सध्या याठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. भविष्यात आणखी रुग्ण वाढल्यास जागेची कमतरता भासू नये यासाठी आत्मा मलिक संकुलात आणखी 300 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक मंदार पहाडे, गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाते, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, महेश लोंढे, सुनिल लोहकणे, प्रसाद साबळे, लायन्स मूकबधिर विद्यालयाचे पोपट गुणवंत आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment