सलून व्यावसायिकांना आर्थिक मदत करावी महाराष्ट्र सलून अ‍ॅण्ड पार्लर असो.चे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, August 10, 2020

सलून व्यावसायिकांना आर्थिक मदत करावी महाराष्ट्र सलून अ‍ॅण्ड पार्लर असो.चे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

 सलून व्यावसायिकांना आर्थिक मदत करावी  

महाराष्ट्र सलून अ‍ॅण्ड पार्लर असो.चे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
नगरी दवंडी /प्रिंतनिधी

अहमदनगर ः संकटात सापडलेल्या सलून व्यवसायिकांना आर्थिक मिळावी व नाभिक समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करावा, या मागणीसाठी महाराष्ट्र सलून अ‍ॅण्ड पार्लर असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी युवक जिल्हाध्यक्ष संदिप खंडाळे, नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष शांतराम राऊत,  गणेश खंडाळे, प्रकाश जाधव, प्रविण जाधव, मनोज जाधव, सुभाष खंडागळे, निलेश जाधव, वैभव जाधव, गणेश कुटे, कानिफनाथ खंडागळे आदि उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  गेली चार महिन्यांपासून सलून व्यवसाय बंद असल्याने सलून व्यवासायिक आर्थिक संकटात सापडले आहेत, त्यामुळे त्यांना आर्थिक मदत द्यावी. लॉकडाऊनच्या काळात आत्महत्या केलेल्या सलून व्यवसायिकांच्या कुटूंबियांना 10 लाखांची आर्थिक मदत करावी. सहा महिन्यांचे लाईट बील व इतर सरकारी कर माफ करावेत. नाभिक समाजाचा अनूसूचित जाती (एससी)मध्ये समावेश करावा. तसेच आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करुन निधी उपलब्ध करुन द्यावा. नाभिक समाजातील थोर समाज सुधारक, संत महापुरुष, शुरवीर, हुतात्मा यांची स्मारके उभारावीत. मनपा, न.पा, ग्रामपंचायतीच्या संकुलामध्ये सलून व्यवसायिकांसाठी गाळे मिळावेत. आदि मागण्या यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आल्या. यावेळी अमोल खंडागळे, अशोक राऊत, अक्षय राऊत, बाळासाहेब खंडाळे, जिजाभाऊ जाधव, ज्ञानेश्वर जाधव, हरिभाऊ जाधव, दादाभाऊ खंडाळे, आत्माराम खंडाळे, योगेश कुटे, दत्ता जाधव आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment