युवकांनी व्यवसायाकडे वळावे : आ.जगताप मुदगल अमृततुल्य चहा सेंटरचा शुभारंभ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, August 17, 2020

युवकांनी व्यवसायाकडे वळावे : आ.जगताप मुदगल अमृततुल्य चहा सेंटरचा शुभारंभ

 युवकांनी व्यवसायाकडे वळावे : आ.जगताप

मुदगल अमृततुल्य चहा सेंटरचा शुभारंभ


नगरी दवंडी /प्रिंतनिधी

अहमदनगर ः युवकांनी शिक्षण पूर्ण घेतल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाकडे वळावे. स्वयंरोजगाराची विविध साधने स्वतःच्या संकल्पनेतून निर्माण करावी. भविष्यात नोकर्‍यांवर अवलंबून न राहता स्वतः इतरांना रोजगार निर्माण करुन देण्याचे ध्येय व त्यासाठी अपार कष्ट करण्याची तयारी तरुणांनी ठेवावी.व्यवसाय करीत असताना जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा व कष्टाच्या बळावर व्यवसाय द्रिगुणीत करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ग्राहकांचा विश्वास संपादन करुन व्यवसायात भरभराटी आणावी. व्यवसाय करीत असताना युवकांना विविध क्षेत्रातील कामाचा अनुभव मिळत असतो. समाजामध्ये काम करत असताना कसे आचरण करावे, लोकसंवाद कसा साधावा व ग्राहकांना कसे समाधान मिळवून देता येईल, या गोष्टींचा अनुभवही मिळतो. नालेगावमधील गाडगीळ पटांगणसमोरील मुदगल अमृततुल्य चहा सेंटरचे उद्घाटन प्रसंगी आ. संग्राम जगताप बोलत होते.
नालेगावमधील गाडगीळ पटांगणसमोरील मुदगल अमृततुल्य चहा सेंटरचे उद्घाटन आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी नगरसेवक दत्ता मुदगल, बाबासाहेब मुदगल, माजी नगरसेविका मथुरा मुदगल, माजी नगरसेविका सुनित मुदगल, नगरसेवक सचिन शिंदे, अप्पा नळकांडे, अजय चितळे, आनंद वायकर, मनोज शिंदे, वैभव वाघ, संचालक सर्वार्थ मुदगल आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना संचालक मुदगल म्हणाले की, शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वतःचा काहीतरी छोटासा व्यवसाय असावा, या विचारातून प्रेरीत होऊन मुदगल अमृततुल्य चहा सेंटरची संकल्पना मनात आली व त्या दृष्टीकोनातून नियोजनपूर्वक या सेंटरची निर्मिती केली. अत्यंत साध्यासोप्या व्यवसायातून जिद्द व कष्टाच्या जोरावर ग्राहकांना उत्तम व दर्जेदार सेवा देत भविष्यात मोठे होण्याचे स्वप्न आहे, असे ते यावेळी म्हणाले.

No comments:

Post a Comment