ड्रिमसिटी 14 ऑगस्टपासून अंधारात महावितरणचे दुर्लक्ष ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 18, 2020

ड्रिमसिटी 14 ऑगस्टपासून अंधारात महावितरणचे दुर्लक्ष !

ड्रिमसिटी 14 ऑगस्टपासून अंधारात महावितरणचे दुर्लक्ष !नगरी दवंडी /प्रिंतनिधी
अहमदनगर ः14 ऑगस्ट पासून ते 16 ऑगस्ट पर्यंत व काल 17 ऑगस्ट मध्यरात्रीपासून नगर-कल्याण रस्त्यावरील महाविर होम्सचा ड्रीम सिटी हा मोठा सात मजल्याचा प्रोजेक्ट आहे. गेली अनेक दिवसांपासून या सोसायटीमधील वीज पुरवठा खंडित होत आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर व्यवस्थापना करून महावितरण कर्मचार्‍यांकडे तक्रार करूनही या प्रश्नांकडे महावितरण कर्मचारी गांभीर्याने पाहत नसल्याचं दिसून येत आहे.
14 ऑगस्ट रोजी या सोसायटीतील ए बी सी  या बिल्डिंगला विद्युत पुरवठा करणारी डिपी बॉक्समधील एक केबल खराब झाल्यानंतर 16 ऑगस्ट सकाळपर्यंत महावितरणाचा एकही कर्मचारी या सोसायटीकडे फिरकत नाही. शेवटी व्यवस्थापनाने खाजगी कर्मचार्‍यांकडून ही केबल बदलून घेतली ही केबल बदलल्यानंतर विद्युत पुरवठा चालू करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी फोन करूनही लवकर आले नाहीत. काल रात्री पुन्हा या सोसायटीचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.

No comments:

Post a Comment