काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्षांची महापौरांवर टीका करण्याची लायकी नाही ः पुष्कर कुलकर्णी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 25, 2020

काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्षांची महापौरांवर टीका करण्याची लायकी नाही ः पुष्कर कुलकर्णी.

 काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्षांची महापौरांवर टीका करण्याची लायकी नाही ः पुष्कर कुलकर्णी.

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः
नगर शहरासह जिल्हयामध्ये कोवीड रूग्णांची संख्या दिवसें दिवस वाढत आहे. शहरामध्ये देखील रूग्ण संख्या वाढत असल्यामुळे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी कोवीड रूग्णांवर उपचार होण्यासाठी तीन ठिकाणी कोवीड सेंटर सुरू केले. या ठिकाणी रूग्णांना चहापाणी, नाष्टा, दोन वेळेस जेवण आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या ठिकाणी करण्यात येणार्‍या उपचारामुळे रूग्ण लवकर बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.असे असताना काँग्रेस शहर अध्यक्ष मयूर पाटोळे महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यावर टीका करत आहेत. महापौरांवर टीका करण्याची त्यांची लायकी नसल्याचे मत भाजपा शक्ती केंद्र प्रमुख पुष्कर कुलकर्णी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात कुलकर्णी यांनी म्हटले आहे की महापौर बाबासाहेब वाकळे साहेब हे वेळोवेळी या कोवीड सेंटरला भेट देवून रूग्णांची व त्या ठिकाणी काम करित असलेल्या कर्मचार्‍यांची, डॉक्टरांची विचारपूस करतात.त्यामुळे कोवीड सेंटरमध्ये काम करित असलेल्या कर्मचार्‍यांचे मनोधौर्य वाढत आहे. रूग्णांची संख्या पाहता लवकरच आणखी एक कोवीड सेंटर सुरू करण्यात येणार आहे. तसेच संपूर्ण जिल्यातून कोवीड प्रादुर्भाव रूग्ण मयत झाल्यास तो जिल्ह्यातील असला तरी अहमदनगर अमरधाम येथे त्यांचा अंत्यसंस्कार होतो.
त्यामुळे नालेगांव अमरधाम येथील विद्युत दाहिनीमध्ये दिवसभरात 10 मयत अंत्यविधी करण्याची मर्यादा आहे. परंतु एखादया दिवशी जास्त रूग्ण मयत झाल्यास त्यांचा अंत्यविधी करण्याचा रूग्णांच्या नातेवाईकाचा आग्रह असतो.अशा वेळी नाईलाजाने अमरधाम मध्ये अंत्यविधी करण्यात येतो. मयत झालेल्या रूग्णांच्या नातेवाईकांवर शोककळा पसरलेली असते.तसेच मोठया मानसिक तनावात ते असतात अशा वेळी अंत्यविधी करण्यास उशीर झाल्यास त्यांच्यावर काय परिस्थिती असेल याचे भान श्री पाटोळे यांना असल्याचे दिसून येत नाही. वास्तविक पाहता श्री पाटोळे हे कोणत्याही कोवीड सेंटरला तसेच सिव्हील हॉस्पीटल तसेच अमरधाम येथे फिरकले देखील नाही. आपण काय बोलतो याचे त्यांना भान नाही. त्यामुळे त्यांची महापौर बाबासाहेब वाकळे यांचेवर टिका करण्याची लायकी नाही.
वास्तविक पाहता त्यांनी टिका करण्यापेक्षा कोवीड रूग्णांना कशी मदत करता येईल याचे अवलोकन करावे. असे श्री पुष्कर कुलकर्णी यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.


No comments:

Post a Comment