मनसे जिल्हा सचिवांची मागणी.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, August 24, 2020

मनसे जिल्हा सचिवांची मागणी..

 मनसे जिल्हा सचिवांची मागणी..

खासदार विखेंना जिल्हाबंदी करा!











नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः खा. विखे एकीकडे लॉकडाऊनची मागणी करतात, तर दुसरीकडे के के रेंजसाठी बैठका घेण्याचे जाहीर करतात. खासदारांना कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवायचाय की कमी करायचा आहे. असा प्रश्न मनसे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी उपस्थित केला असून, कोरोना नियंत्रणात येईपर्यंत त्यांना जिल्हाबंदी करा अशी मागणी केली आहे.जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की
संपुर्ण देशात कोरोना आजाराने थैमान घातले असतानां अहमदनगर जिल्ह्यात सुध्दा  दररोज 500 च्या वर रुग्ण सापडत आहेत त्यातच एका बाजुला वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एक पत्रकार परिषद घेत जिल्ह्यात नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे यांनी जिल्ह्यात लॉकडाऊन ची मागणी केली होती. ही केलेल्या मागणीचा काही दिवसांनंतर 2 ते 4 दिवसांपासून हेच खासदार सुजय विखे के के रेंज च्या जागेच्या प्रश्नासाठी जिल्ह्यातील नगर, पारनेर व राहुरी या तीन   तालुक्यातील काही गावांमध्ये 200 ते  500 लोकांच्या बैठका खासदार घेत या गावांमधील जनतेची दिशाभुल करुन राजकारण करण्याचा प्रकार खासदार करत  असुन खासदारांना कोरोनाच प्रादुर्भाव वाढवायचा का थांबवायचा हे या दोन्ही घटनेतून समजत नसुन त्यांच्या विषयी नगर च्या जनतेच्या मनात संशयाचे वातवरण तयार झाले आहे.असेच जर सभा बैठका खासदार घेत राहिले तर या सर्व बैठका झालेल्या गावां मध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होउन संपुर्ण जिल्ह्याला याचा फटका बसणार आहे व वाढत्या कोरोना संसर्गला जबाबदार कोन असा सवाल मनसेचे नितीन भुतारे यांनी जिल्हा अधिकारी साहेबाना निवेदना द्वारे विचारला असुन या सर्व के के रेंज संदर्भात घेतलेल्या बैठका मध्ये शेकडो नागरिक जमले असुन कुठेही सोशल डिस्टनसिंग नाही खासदार विखेंना जिल्हाबंदी करा!
काहींनी मास्क घातले तर कहिनी नाही. कुठेही सॅनिटायझर वापरलेले दिसत नसुन जमाव बांधीच्या आदेशाचे उल्लघन केलेले आहे हे सर्व बैठकींचे फोटो बातम्या अनेक वृत्तपत्रात छापुन आले असतांना राजकिय सभा बैठका यांना बंदी असतांना देखील प्रशासनाने कुठल्याही प्रकारची कारवाई अजुन पर्यन्त केलेली नसुन मग सर्व सामन्यांना वेगळा न्याय व लोकप्रतिनिधींना वेगळा न्याय हे या प्रकरातून दिसत आहे. हे जिल्हाधिकारी साहेबांच्या निदर्शनास आणुन दिले.अशाच प्रकारच्या सभा बैठका,खासदार हे घेणार असतील व एक डॉक्टर या नात्याने कोरोना जिल्ह्यात वाढविण्याचा ठेका घेतलेला असेल तर हे जनतेसाठी जनतेच्या आरोग्यासाठी घातक असुन  वेगवेगळ्या ठिकानी अशीच गर्दी खासदार डॉक्टर या नात्याने हे करनार असतील तर कोरोना संपुष्टात येई पर्यंत  खासदारांना नगर दक्षिण जिल्हा बंदी करा. व घेतलेल्या सभा ह्या नियम बाह्य असुन आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत कारवाई करा अशी मागणी मनसेचे नितीन भुतारे  यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment