डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने नागापूर येथे रक्तदान शिबीर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 11, 2020

डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने नागापूर येथे रक्तदान शिबीर

डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीन नागापूर येथे रक्तदान शिबीर

सोशल डिस्टन्सचे पालन करत 225 जणांचे रक्तदान; आ.जगताप व आ.लंके यांच्याकडून डॉ.धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक


नगरी दवंडी /प्रिंतनिधी
अहमदनगर ः जागतिक महामारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा (जिल्हा- रायगड) यांच्या वतीने अहमदनगर येथील एमआयडीसी मधील नागापूर निंबळक रस्त्यावर असलेल्या रेणुकामाता स्ट्रस्टच्या सभागृहात रविवारी दि.9 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात 225 जणांनी सोशल डिस्टन्स चे तंतोतंत पालन करत रक्तदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावले. या रक्तदान शिबिरास नगर शहराचे आमदार संग्राम जगताप व पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी भेट देऊन कोरोनाच्या संकट काळात डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने राबविलेल्या या रक्तदानाच्या उपक्रमाचे कौतुक केले.
रक्तदान शिबिराचे उद् घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व शिव समर्थ प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आले. रविवारी दि.9 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 3 या कालावधीत हे रक्तदान शिबिर संपन्न झाले. विशेष म्हणजे या शिबिरात श्री सदस्यांचा सहभाग उत्स्फूर्त होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार सोशल डिस्टन्स चे पालन करत सर्व रक्तदाते अंतर ठेवून रांगेत बसले होते.
या रक्तदान शिबिरामध्ये नगर शहरातील श्री समर्थ बैठकांमधील वंजारगल्ली, नालेगाव, सावेडी, भिंगारमधील सारस कॉलनी, केडगांशमधील अंबिकानगर, एमआयडीसी, भाळवणी, धोत्रे, कान्हूर पठार, पारनेर, कोळगाव, नारायण गव्हाण, पिंपरी कोलंदर, चिंचोडीपाटील, राहुरी, नेवासा, घोडेगाव, वळण येथील श्री सदस्य स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने या शिबिरात संकलित करण्यात आलेले रक्त कोरोना महामारीच्या या संकटकाळात जिल्हा रूग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांकरता जिल्हाशल्यचिकित्सकांकडे सुपूर्त करण्यात आले. या रक्तदान शिबिरामध्ये  18 ते 45 वयोगटातील युवकांचा लक्षणीय सहभाग होता. या सर्व रक्तदान करणार्‍या रक्तदात्यांचा व श्री सदस्यांचा आमदार संग्राम जगताप व आमदार निलेश लंके यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.  या रक्तदान शिबिरप्रसंगी आमदार संग्राम जगताप व आमदार निलेश लंके यांच्यासह वडगाव गुप्ताचे सरपंच विजय शेवाळे, नागापूरचे सरपंच बबनराव डोंगरे, रेणुकामाता ट्रस्टचे अध्यक्ष जगन्नाथ भोर यांनी भेट देऊन प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे आणि श्रीसदस्यांच्या शिस्तबध्दतेचे भरभरून कौतुक केले.

No comments:

Post a Comment