नेवासा तालुका शिक्षक परिषद आणि गुरुमाउली मंडळ निवडी जाहीर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, August 24, 2020

नेवासा तालुका शिक्षक परिषद आणि गुरुमाउली मंडळ निवडी जाहीर

 नेवासा तालुका शिक्षक परिषद आणि गुरुमाउली मंडळ निवडी जाहीर

शिक्षक परिषद अध्यक्षपदी दशरथ ढोले, गुरुमाउली मंडळ अध्यक्षपदी संदीप शिंदे

नेवासाफाटा : नेवासा तालुका शिक्षक परिषद व गुरुमाउली मंडळाच्या (रोहोकले प्रणित) ऑनलाईन निवडी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टनसिंगचे काटेकोरपणे पालन करीत शिक्षक परिषदेचे राज्य संपर्कप्रमुख रावसाहेब रोहोकले गुरुजी, राज्य उपाध्यक्ष संजय शेळके, शिक्षक परिषद जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे, गुरुमाउली मंडळ जिल्हाध्यक्ष विकास डावखरे तसेच शिक्षक बँकेचे संचालक राजेंद्र मुंगसे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या. यामध्ये शिक्षक परिषद अध्यक्षपदी दशरथ ढोले, गुरुमाउली मंडळ(रोहोकले प्रणित) अध्यक्षपदी संदिप शिंदे, तालुका उच्चाधिकार समिती अध्यक्षपदी बाबाजी शिंदे, युवा परिषद अध्यक्षपदी सचिन इंगळे, महिला आघाडी अध्यक्षपदी श्रीमती सविता दरंदले, मुख्याध्यापक परिषद अध्यक्षपदी अशोक गायकवाड, पदवीधर परिषद अध्यक्षपदी ज्ञानेश्वर जाधव, सांस्कृतिक परिषद अध्यक्षपदी सुभाष चव्हाण यांची निवड करण्यात आली.

शिक्षक परिषदेचे राज्य संपर्कप्रमुख रावसाहेब रोहोकले गुरुजी, प्रवीण ठुबे, विकास डावखरे, राजेंद्र मुंगसे, श्रीकृष्ण खेडकर, विकास मंडळाचे चेअरमन संजय शिंदे, कल्याणराव पोटभरे, राजेंद्र जायभाये, आर.पी.रहाणे, दिलीप औताडे, गणेश वाघ, नवनाथ भापकर, सु.पा.वांढेकर, संतोष अकोलकर. राजाभाऊ पालवे, बबन भालेराव, राम निकम, मोहन राशिनकर, रविंद्र कडूपाटील,शशी सावंत, खंडेराव उदे, सुनील पवळे, सुहाग साबळे, रामदास बाबगोसावी, डॉ.रेवणनाथ पवार, नंदकुमार पाथरकर, संतोष निमसे, श्रीमती सुनिता कर्जुले, श्रीमती मीनाक्षी महांडूळे आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना रावसाहेब रोहोकले गुरुजी म्हणाले कि, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद ही सध्या कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याचे काम प्राधान्याने करीत आहे. परिषदेमार्फत या लॉकडाऊन काळात शिक्षकांसाठी ऑनलाईन चर्चासत्रे, नवीन शैक्षणिक धोरणावर सुसंवाद मीटिंग तसेच शिक्षकांसाठी तंत्रज्ञान कार्यशाळा राबविल्याचेही त्यांनी सांगितले. 

प्रवीण ठुबे यांनी शिक्षक परिषदेमार्फत शिक्षकांच्या अडचणी सोडविण्यासंदर्भात करीत असलेल्या कार्याची माहिती दिली. तसेच येत्या काळात सर्व पदोन्नती प्रक्रिया, उचझ प्रणालीमार्फत मेडिकल बिले अदा करणेबाबत पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. विकास डावखरे यांनी शिक्षक बँक कामकाजाबाबत माहिती सांगितली. संजय शेळके यांनी सर्व नूतन कार्यकारिणी पदाधिकार्यांचे अभिनंदन करून त्यांना भविष्यातील संघटनात्मक कार्याबाबत मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.

दशरथ ढोले, संदीप शिंदे, बाबाजी शिंदे, सविता दरंदले, ज्ञानेश्वर जाधव, शिवाजी गायकवाड, सचिन इंगळे आणि सुभाष चव्हाण यांनी आपल्या झालेल्या निवडीबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करीत या निवडी सार्थ ठरवून तालुक्यातील शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात लढा देऊ असे सांगितले.

नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :  जिल्हा प्रतिनिधी:- राजेंद्र मुंगसे, मोहन राशीनकर,श्रीमती तारा घाडगे,अशोक पंडित,कल्याण नेहुल,शकील खान,अनिल नाईक,गणेश शेलार,राजेंद्र चापे, संतोष निमसे,दत्तात्रय चोथे, श्रीमती सुरेखा मंडलिक, अशोक ढोले

शिक्षक परिषद:- अध्यक्ष-दशरथ ढोले, कार्याध्यक्ष-सूर्यकांत कदम, सरचिटणीस पृथ्वीराज वाघाडे, कोषाध्यक्ष- कैलास म्हस्के, उपाध्यक्ष-गोरक्षनाथ नवघरे, उपाध्यक्ष-गणेश नाईक, उपाध्यक्ष-बाळकृष्ण ताके, कार्यालयीन चिटणीस - संजय शिंदे, संपर्कप्रमुख-साईनाथ वडते, प्रसिध्दी प्रमुख-वाजेद खान पठाण, ऑडीटर-अमोल गजभिव, सल्लागार-प्रशांत वाव्हळ, सल्लागार-विजय परदेशी, संघटक- प्रदीप बोरुडे

गुरुमाउली मंडळ(रोहोकले प्रणित):- अध्यक्ष-संदिप शिंदे, कार्याध्यक्ष-सुनील वाघ, सरचिटणीस-ऋषी गावडे, कोषाध्यक्ष-बाळासाहेब उभेदळ, उपाध्यक्ष-बाळासाहेब कराड, उपाध्यक्ष-हनिफ अल्लाउद्दीन शेख, उपाध्यक्ष-संतोष दरोडे, कार्या.चिटणीस-शंकर साबळे, संपर्कप्रमुख-सीताराम आरगडे, प्रसिद्धी प्रमुख-जमीर शेख, ऑडीटर-देविदास दिवटे, सल्लागार-योसेफ मकासरे, मार्गदर्शक-संदीप वाघमारे

तालुका उच्चाधिकार समिती:- अध्यक्ष-बाबाजी शिंदे, कार्याध्यक्ष-अण्णासाहेब कोकणे, सरचिटणीस-अकबर शेख, कोषाध्यक्ष-संभाजी कडू, कार्यालयीन चिटणीस-संजय फाजगे, संपर्कप्रमुख-कलीम शेख, उपाध्यक्ष-श्याम फंड, उपाध्यक्ष-जालिंदर गोरे, उपाध्यक्ष-कारभारी कर्जुले, मार्गदर्शक-बाबासाहेब गायकवाड

युवा परिषद:- अध्यक्ष-सचिन इंगळे, कार्याध्यक्ष-गणेश सातपुते, सरचिटणीस-अल्ताफ शेख, कोषाध्यक्ष-आदिनाथ गिरी, कार्यालयीन चिटणीस-राजेंद्र गायकवाड, संपर्कप्रमुख-सुभाष पवार, उपाध्यक्ष-राहुल लोखंडे, उपाध्यक्ष-रवी गादेवार, प्रसिद्धी प्रमुख- गणेश बोरुडे, ऑडीटर-पंकज राठोड, संघटक-रविंद्र तुपे, संघटक-अविनाश कदम, संघटक-अनिल सुरडकर, संघटक-राजेंद्र मानवतकर

महिला आघाडी:- अध्यक्षा-श्रीमती सविता दरंदले, कार्याध्यक्षा-श्रीमती सुनिता निकम, सरचिटणीस-श्रीमती हर्षा फसले, कोषाध्यक्षा- श्रीमती ज्योती गाडेकर, उपाध्यक्षा-श्रीमती वर्षा आगाशे, उपाध्यक्षा-श्रीमती स्नेहल काळपुंड, उपाध्यक्षा-श्रीमती मनिषा कावरे, सहचिटणीस-श्रीमती अनिसा पठाण, संपर्कप्रमुख-श्रीमती लता कोथिंबीरे, कार्या.चिटणीस- श्रीमती शितल गलराह, ऑडीटर-श्रीमती आशा तांबे, सल्लागार-श्रीमती संध्या लोंढे, मार्गदर्शक-श्रीमती मालन कोळपकर, संघटक-श्रीमती मंगल बनकर, संघटक-श्रीमती मनीषा जवणे, संघटक-श्रीमती सविता आव्हाड

मुख्याध्यापक परिषद:- अध्यक्ष-अशोक गायकवाड, कार्याध्यक्ष-विश्वनाथ कुसळकर, सरचिटणीस-गोपीनाथ पवार

पदवीधर परिषद:- अध्यक्ष-ज्ञानेश्वर जाधव, कार्याध्यक्ष-शिवनाथ कुसळकर, सरचिटणीस-सतिश भोसले, कोषाध्यक्ष-श्रीमती शारदा लोटके, कार्यालयीन चिटणीस- फय्याज शेख, प्रसिद्धी प्रमुख-धम्मदीप उके, मार्गदर्शक-नारायण बर्डे, उपाध्यक्ष-सुभान शेख, संघटक-शिवाजी गायकवाड

सांस्कृतिक परिषद:- अध्यक्ष-सुभाष चव्हाण, कार्याध्यक्ष-श्रीमती संपदा ससे, सरचिटणीस-श्रीमती सविता घोडके, कोषाध्यक्ष-श्रीमती रंजना दळे, संपर्क प्रमुख-श्रीमती प्रमिला दाणे, मार्गदर्शक-श्रीमती शामला काळपुंड, उपाध्यक्ष-श्रीमती सुरेखा गायकवाड, संघटक-प्रवीण एडके, संघटक-श्रीमती मीनाकुमारी वर्मा.  जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय चोथे सर यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद,अहमदनगरच्या जिल्हा संघटन मंत्रीपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. संतोष ढोले यांनी संपूर्ण कार्यकारिणी निवड प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पाडली. सदर प्रक्रियेत शिवाजी झगरे यांचे विशेष सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment