खा. विखे व माझ्यातील गैरसमज व मतभेद संपुष्टात! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, August 20, 2020

खा. विखे व माझ्यातील गैरसमज व मतभेद संपुष्टात!

 खा. विखे व माझ्यातील गैरसमज व मतभेद संपुष्टात!

‘शेतकरी निवास’ सभागृहाला कै. विश्वासराव भापकर (लेले काका) यांचे नाव व भाजप पदाधिकार्‍यांचा सत्कार


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः गेल्या 25 वर्षांमध्ये विकास कामांमध्ये कधीही राजकारण केले नाही. प्रत्येक पक्षामध्ये एकमेकांमध्ये मतभेद, नाराजी असते. खा. सुजय विखे आणि मी तर भाजप पक्षाचे आहोत. आमच्यातील समज गैरसमज व मतभेद आता संपुष्टात आले आहेत. असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांनी केले आहे. पुढील काळात जिल्ह्याच्या विकासासाठी काम करणार आहे. राजकीय विरोधापेक्षा त्यांच्या कामाची दखल पुढील पिढीला कळावे, यासाठी स्व. खा. दादापाटील शेळके यांचे नाव नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीला दिले तसे समितीच्या सभापतीपदी 12 वर्षे काम करुन कै. विश्वासराव भापकर (लेले काका) यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला होता. त्यांच्या कामाची दखल म्हणून शेतकरी निवासाच्या सभागृहाला त्यांचे नाव देण्याचे कार्यक्रम वभाजपा पदाधिकार्‍यांच्या सत्कार र्पसंगी ते बोलत होते. श्री कर्डीले पुढे म्हणाले की नगर, राहुरी व पारनेर तालुक्यातील शेतकर्‍यांच्या जमिनी के. के. रेंजसाठी संपादित करण्याचे काम सुरु केले होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची खा. सुजय विखे व आम्ही भेट घेऊन माहिती दिल्यानंतर लगेच काम थांबविण्याचे आदेश त्यांनी दिले. विम्याच्या प्रश्नासाठी केंद्रीय कृषीमंत्री यांची भेट घून प्रश्न मार्गी लावला. गुंडेगावचे नाव चुकल्यामुळे शेतकर्‍यांना विमा मिळण्यास अडचण झाली होती, तोही प्रश्न मार्गी लावला. भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पदाचा उपयोग जनतेसाठी करावे, असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले. नगर तालुका बाजार समितीच्या शेतकरी निवासाच्या सभागृहास कै. विश्वासराव भापकर (लेले काका) यांचे नाव देऊन अनावरण करण्यात आले. तसेच नूतन भाजप पदाधिकार्‍यांचा सत्कार संपन्न झाला. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, सभापती अभिलाष घिगे, व्हा. चेअरमन संतोष म्हस्के, भायुमोचे सरचिटणीस अक्षय कर्डिले, संचालक दिलीप भालसिंग, वसंत सोनवणे, रेवन्नाथ चोभे, शिवाजी कार्ले, बाबासाहेब जाधव, संतोष कुलट, बबन आढाव, दीपक कार्ले, सुनिता दळवी, शरद दळवी, रभाजी सूळ, शाम पिंपळे, सुधीर भापकर, मनोज कोकाटे, बाळासाहेब मेटे, मोहन गहिले, रोहित भुजबळ, अजय गारदे, रवींद्र पिंपळे, संतोष भापकर, मधुकर मगर, श्रीकांत जगदाळे, राजेंद्र तोडमल आदी उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री कर्डिले पुढे म्हणाले की, मनाचा मोठेपणा प्रत्येक कार्यकर्त्याने ठेवला पाहिजे. शेतकर्‍यांचा दूध व्यवसाय हा जोडधंदा आहे. परंतु दुधाचे भाव पडल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. सरकारने दुधाचे भाव वाढावावे, अन्यथा आंदोलनाच्या भूमिकेतून विरोधी भूमिका बजावी लागेल. जिल्हा बॅकेच्या माध्यमातून दुष्काळी व जिराईत भागाला न्याय देण्याचे काम केले.शेतकर्‍यांसाठी गायीचा चारा व खुराकासाठी खेळते भांडवल म्हणून प्रत्येकी 15 हजार रुपये असे कर्ज वाटप केले जाणार आहे. जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी याचा लाभ घ्यावा. जिल्हाधिकारी यांना पंचनामे करण्याच्या सूचना दिले आहे. पावसाळ्यामध्ये शेतीमालाचे नुकसान झालेल्यांचा पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली. भाजप पदाधिकार्‍यांनी केंद्र
शासनाचे घेतलेले निर्णय गावपातळीपर्यंत पोहचविण्याचे काम करावे. यावेळी अक्षय कर्डिले म्हणाले की, भाजप पक्ष वाढीसाठी काम करणार आहे. जिल्ह्यातील युवकांना एकत्र करुन सामाजिक उपक्रम राबविले जातील. पक्षाची ध्येयधोरणे गावपातळीवर पोहचविण्याचे काम आम्ही करणार आहोत, असे ते म्हणाले. सभापती अभिलाष घिगे म्हणाले की, बाजार समितीच्या प्रगतीमध्ये माजी सभापती कै. विश्वासराव भापकर यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी बाजार समितीच्या सभापतीपदी 12 वर्षे काम करत असताना शेतकर्‍यांसाठी व व्यापार्‍यांसाठी विविध निर्णय घेतले असल्यामुळे भावी पिढीला त्यांच्या योगदानाची आठवण म्हणून बाजार समितीने शेतकरी निवासाच्या सभागृहाला त्यांचे नाव देऊन त्यांचा गौरव केला आहे. तसेच नूतन भाजप पदाधिकार्‍यांचा सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
नगर तालुका भाजप कार्यकारिणी - अध्यक्ष मनोज कोकाटे, उपाध्यक्ष नानासाहेब बोरकर, देवीदास आव्हाड, संजय जपकर प्रशांत गहिले, राजू दारकुंडे, भाऊसाहेब लगड, उमेश डोंगरे, पोपटराव शेळके, सरचिटणीस बाबासाहेब काळे, मंजाबापू बेरड, भाऊसाहेब काळे, आरतीताई कडूस, चिटणीस सुखदेव मोरे, संदीप भापकर, राजेंद्र तोडमल, गणेश भालसिंग, विक्रम पालवे, राजेंद्र कोतकर, बबनराव शिंदे, प्रमोद पंडित, कोषाध्यक्ष गोवर्धन शेवाळे, कार्यालयीन प्रमुख गणेश खांदवे, प्रसिद्धीप्रमुख सागर भोपे, जिल्हा कार्यकारिणी : भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अक्षय कर्डिले, जिल्हा उपाध्यक्ष शामराव पिंपळे, जिल्हा सरचिटणीस दिलीप भालसिंग, चिटणीस अनिल लांडगे, सुनिता दळवी, कार्यालयीन प्रमुख दादासाहेब बोठे, कार्यकारी सदस्य रभाजी सूळ, बाजीराव हजारे, रोहित भुजबळ, शरद दळवी, रमेश पिंपळे, विशेष कायम निमंत्रित सदस्य अँड. युवराज पोटे आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment